*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अमरावती ;--2014 ला जी माऊली उभी राहिली तेव्हा म्हणाल्या पवार साहेब माझे वडील आहेत. आता अमित शाह यांच्यासाठी पितृतुल्य झाले आहेत. सत्तेसाठी बाप बदलणारे असतील तर याला काय म्हणावं? महाराष्ट्र गद्दारांना थारा देत नाही.. महाराष्ट्र प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवते. आम्ही वारंवार प्रश्न विचारत राहणार आहोत, अशी टीका ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांची नक्कल करत केली. त्या अमरावती येथील सभेत बोलत होत्या. यावेळी सुषमा अंधारे यांनी गणेशाचे मंत्रही म्हटले.
एक दिन मे रश्मी बर्वेच जात प्रमाणपत्र रद्द होते
सुषमा अंधारे म्हणाल्या, नवनीत आक्कावर हल्ला करणारा आमचा शिवसैनिक पण मंचावर आहे. दोन दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये एक लाईन सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये आलबेल आहे का? इकडे सगळं आलबेल आहे. जिथं आलबेल नाही तिथल्या बातम्याकडे लक्ष द्यावे,अशी मी अपेक्षा करते. जर मला जात चोरता आली असती तर मला कदाचित अमरावती निवडणूक लढवता आली असती. एक दिन मे रश्मी बर्वेच जात प्रमाणपत्र रद्द होते आणि पाच वर्षांपासून नवनीत राणा यांचा निकाल का लागत नाही? निकाल काय लागणार हे माहीत आहे का? गणेश विसर्जन कसं करतात हे तरी कळते का? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला.
या लोकांना संविधान बदलायचं आहे
उदयनराजे यांना चार दिवस वेटिंगवर ठेवले. एकाच रात्री नवनीत राणाची उमेदवारी दिली आणि लगेच एकाच दिवशी अमित शहा भेटतात. देवा भाऊ नवनीत राणाचं वजन तुमच्यापेक्षा जास्त होत आहे का? ही निवडणूक लोकांनी आपल्या हातात घेतली आहे. त्यांना सगळं माहीत आहे की काय घडलं. जितका मोठा घोटाळा तितकं पद मोठं ही मोदींची गॅरंटी आहे. संविधान धोक्यात आलं आहे. या लोकांना संविधान बदलायचं आहे. ज्या बाईने हनुमान चालीसा वर वादंग केलं त्यांना अजूनही हनुमान चालीसा म्हणता येत नाहीये, असंही अंधारे यांनी नमूद केलं.
पाच वर्षांपूर्वी शाई लावली की चुना लावला
भाजपच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं असेल. इथले भाजपचे लोक ही नवनीत राणाला मतदान करणार नाहीत. कापसाला भाव फक्त 11 हजार रुपये दर हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना शेतकऱ्यांना मिळाला. आज 6 हजार रुपये पेक्षा कमी मिळत आहे. ज्या ज्या लोकांच्या घरी धाडी टाकल्या त्याच्या पाच ते सहा दिवसात त्या लोकांनी पार्टी फंड दिलेला आहे. नवनीत राणाला मतदान करतांना तुम्ही शरद पवार यांच्याकडे पाहून दिले. आता असं वाटत आहे की, पाच वर्षांपूर्वी शाई लावली की चुना लावला. नवनीत राणा यांना मी खुलं आवाहन करते की, अमरावतीच्या गरीब लेकरांना दत्तक घेऊन त्यांना फुकटात शिक्षण देऊन दाखवा. अमरावतीच्या उमेदवाराला निवडून द्या. तुम्ही भावनिक होऊ नका, अस आवाहनही सुषमा अंधारे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा