Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १ मार्च, २०२४

*अंगी प्रामाणिक पणा,स्वाभिमान,आणि गरिबां बाबत तळमळ आदि शिकवण मला माझ्या वडिलाकडून मिळाली.---राहुल ढेरे ,कार्याध्यक्ष मा.ता. -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

           आज 1 मार्च माझे वडिल तानाजी महादेव ढेरे यांचा 78 वा वाढदिवस "बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा "आई जगदंबेच्या पांडुरंगाच्या नंदेश्वराच्या कृपेने उदंड उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना....

              बाबा नशीबवान आहे मी (राहुल तानाजी ढेरे) बाबा तुमचा पुत्र, मुलगा म्हणून जन्माला आलो आज मी गेली 19 वर्ष अकलूज मधील प्रस्थापित सत्ताधारी या लोकांच्या विरोधात सतत संघर्ष करतोय माझं स्वतः च आयुष्य सत्कर्मी आणि सार्थकी लाभो म्हणून मी पांडुरंगाला, नंदेश्वराला नतमस्तक होतो आणि संघर्ष करत राहतो माझ्या अंगात प्रमाणिक पणा स्वाभिमान आणि गरिबांच्या विषयीची तळमळ ही माझ्या वडिलांकडून च मला मिळालेली देणगीच, शिकायला मिळाले आपल्या हातून एखाद्या च चांगले नाही झाले तरी चालेल पण वाईट मात्र कोणाचं करायचे नाही हे माझे वडील नेहमीच सांगायचे ..1966 ते 1975 च्या दशकात अकलूज मधील प्रस्थापित सत्ताधारी लोकांच्या पेक्षा ही माझे वडील पैशाने , मनाने मोठे होते. शंभर एकर जमीन अकलूज मध्ये घ्यायची ताकद असताना एक गुंठा सुद्धा अकलूज मध्ये घेतला नाही हा माझ्या वडिलांचा मोठे पणा , मनाची श्रीमंती होती . आयुष्य भर सामाजिक कार्य करत राहिले 

       आज प्रस्थापित सत्ताधारी लोकांच्या विरोधात माझ्या लढण्याला जी उर्जा आहे ती माझ्या वडिलांकडून च मिळाली . 

बाबा तुम्हाला उदंड उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी भगवंताला वाढदिवसानिमित्त प्रार्थना. 

          

                   शुभेच्छूक . ,राहुल ढेरे अकलूज कार्याध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस तालुका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा