Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १ मार्च, २०२४

*मुलगा मुलगी असा भेदभाव नको--सर्वांना मोफत उच्चशिक्षण देण्याची उच्च व तंञशिक्षण मंञी "चंद्रकांत पाटील"यांची घोषणा..*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी

*मो.9730 867 448

मुंबई :--जून २०२४ पासून महाराष्ट्रातील सर्व मुलींना सर्व उच्चशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वसतिगृह मिळत नाही, त्यांना दरमहा ५ हजार ३०० रुपये देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला शिक्षण, प्रवास, राहणे आणि भोजन मोफत देणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पाटील यांच्या या घोषणेनंतर मुलींच्या पालकांनी व मुलींनी आनंद व्यक्त केला. मात्र, मुलांनी व पालकांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. आता मुलांनाही मोफत शिक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने बुधवारी आमदारांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला.

मुलींच्या पालकांना मुलीच्या शिक्षणासाठी १ रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. अगदी प्रवेश फीपासून ते परीक्षेच्या फीपर्यंत, सर्व खर्च हा राज्य सरकारद्वारे केला जाणार आहे. मेडिकल, इंजिनीअरिंगसारख्या महागड्या शिक्षणासोबत एकूण ८०० कोर्समध्ये मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे. याबाबत स्वत: उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकृत घोषणा केली आहे.

या घोषणेनंतर गरीब कुटुंबातील मुलांनी व त्यांच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने मुलगा-मुलगी भेद न करता सर्वच गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आता, शिवसेना उबाठा गटाचे आमदार विलास पोतनीस यांनी विधान परिषेदत हा मुद्दा उपस्थित करत, मुलगा-मुलगी भेद न करता, ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुला-मुलींना म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. ज्यांना आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही, अशा सर्व मुला-मुलींना भेद न करता शुल्क माफी द्यावी,अशी मागणी आमदार विलास पोतनिस यांनी केली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा