*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
*तसद्दूक अहमद खान शेरवानी यांच्या 90 व्या पुण्यतिथी निमित्त*
सन 1885 मध्ये उत्तर प्रदेश राज्यातील अलीगड जवळील बिलोना गावात जन्मलेल्या ब्रिटिश राजवटी विरूद्धच नव्हे तर सामाजिक विषमता व अंधश्रद्धांविरूद्ध लढा देणारे तसद्दोक अहमद खान शेरवानी यांचा जन्म झाला. त्यांनी अलीगढच्या मोहम्मदन एंग्लो-ओरिएंटल महाविद्यालयात शिक्षणसाठी प्रवेश घेतला.जिथे त्यांनी विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व केले . या नंतर तसददुक अहमद खान शेरवानी भारतीय स्वतंत्रता लढा चळवळीकडे आकर्षित झाले आणि त्यांनी महाविद्यालयाच्या ब्रिटीश समर्थक भूमिकेला विरोध दर्शविला आणि व्यवस्थापनावर टीका केली, ज्यामुळे आपल्याला कॉलेज मधून काढून टाकण्यात आले. नंतर ते लंडनला गेले, तेथे त्यांनी मध्ये बार--एट-लॉ पूर्ण केले.1912 मध्ये ते भारतात परतले आणि अलीगढमध्ये कायदेशीर सराव सुरू केला. 1916 मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तिथे मोतीलाल नेहरू, सी. आर. दास, महात्मा गांधी, डॉ. एम.ए. अन्सारी आणि इतर नेत्यांसोबत सहवासाची संधी मिळाली.1916 मध्ये तसद्दूक अहमद खान शेरवानी यांनी होमरुल चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आपला सन 1919 पर्यंत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस च्या प्रमुख नेत्यांमध्ये समावेश होऊ लागला . तेव्हापासून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात मोठ्या प्रमाणात सहभाग घेणे सुरू केले आणि त्यांच्या स्वतंत्रता लढयातील संघर्षासाठी त्यांना देशपातळीवर मान्यता मिळाली.1920 मध्ये अमृतसर येथे मुस्लिम लीगने घेतलेल्या बैठकीत अहमद खान यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी हिंदू-मुस्लिम यांच्यात परस्पर सामंजस्य व मैत्रीचे जोरदार समर्थन केले. . जातीयता हा सर्वांसाठी धोकादायक आहे, असा इशारा त्यांनी लोकांना दिला. डिसेंबर 1920 मध्ये झालेल्या सभेत अहिंसा आणि असहकार चळवळींना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी अखिल भारतीय मुस्लिम लीगला आवाहन केले. अहमद शेरवानी यांनी मुस्लिम लीग आणि इंडियन नॅशनल कॉंग्रेस यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व खिलाफत समितीने केलेल्या आवाहनाला उत्तर देताना त्यांनी सन 1920 मध्ये खिलाफत - असहकार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला, ज्यामुळे त्यांना सन 1921 व 1932 मध्ये तुरुंगवास भोगावा लागला. 1932 मध्ये जेव्हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसवर बंदी घालण्यात आली तेव्हा तसददुक अहमद यांना सुद्धा तुरूंगात डांबण्यात आले. आपले संपूर्ण जीवन देश स्वतंत्र चळवळीत घालविनाऱ्या महान देशभक्ताचे 22 मार्च 1935 रोजी निधन झाले
*संदर्भ- 1)THE IMMORTALS*
*लेखक syed naseer ahamed*
संकलन तथा अनुवादक लेखक *अताउल्ला खा रफिक खा पठाण सर टूनकी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र*
9423338726
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा