*टाइम्स 45 न्युज मराठी
*मो. 9730 867 448
आरपीआय आठवले गटाला मित्र पक्षांनी लोकसभा निवडणुकीत शिर्डी व सोलापूर या दोन जागा सन्मानाने सोडाव्यात अन्यथा आरपीआयचे कार्यकर्ते बंडाचे निळे निशाण फडकवतील हा लेख मी कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी व मित्र पक्षाचे दुटप्पी धोरण यांवर लिहला तो सोशल मीडिया वर सोलापूर जिल्हा माण खटाव फलटण माढा इंदापूर पंढरपूर पुणे येथील आटपाडी मोहोळ माळशिरस तालुक्यातील अनेकांनी प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पाडला अनेकांनी म्हटले आहे की सत्तेच्या एका जागेसाठी किंवा एका राज्यमंत्री पदासाठी आपले नेते रामदास आठवले यांनी स्वतः मधील पँथर मरू देऊ नये आरपीआय चा प्रत्येक कार्यकर्ता पँथर म्हणून त्यांची जी ताकद वलय व अस्मिता स्वाभिमान आहे ती सत्तेसाठी लाचार होऊन स्वाभिमान मिळवता येणार नाही भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना कांग्रेस व इतर लहान घटक पक्ष सत्तेसाठी आरपीआय चा मतापुरता वापर करतात व सत्ता पद द्यायचे वेळी आरपीआय कार्यकर्त्यांना खड्या सारखे बाहेर टाकले जाते बहुतांश कार्यकर्त्यांनी म्हटले आहे
की स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना सन्मानाची पदे द्यायची वेळ येते तेव्हा त्यांना हेतुपुरस्सर डावलले जाते सत्ता हे परिवर्तनाचे मोठे शस्त्र आहे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे मात्र सामाजिक राजकीय संदर्भ बदलले जात आहेत संविधान अभ्यासले जात नाही सत्तेच्या खुर्च्या मिळवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाणारे प्रस्थापित राजकीय पक्ष कंबरेचे गुंडाळून डोक्याला बांधत आहेत जात धर्म गटबाजी स्वार्थाचा बाजार मांडला जात आहे आरपीआयची युती असतानाही त्यांना जागा न सोडणे सन्मान न करणे एखादे राज्यमंत्री पदाचा तुकडा टाकून दावणीला बांधून घेणे यामुळे आरपीआय कार्यकर्त्यांमधील पँथर मारण्याचा एक प्रकारे मनुवादी व्यवस्था जोपासणारी प्रवृत्ती ओळखण्याची वेळ आली आहे धर्मांध शक्तींना दाखवून दिले पाहिजे पँथर अभी भी जिंदा है
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा