*टाइम्स 45 न्युज मराठी
*मो. 9730 867 448
: माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे लोकसभा निवसणूकीच्या अनुषंगाने माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड हे आज दुपारी आले होते. मात्र, गावात आगमन होताच काही मराठा आंदोलक युवकांनी त्यांची गाडी अडवली. तसेच त्यांना खाली उतरण्यास मज्जाव केला. मराठा आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे माजी खासदार गायकवाड यांना गाडीतून खाली न उतरताच परतण्याची वेळ आली.
बीड जिल्ह्याचे दोन वेळा खासदार राहिलेले व एक वेळा केंद्रात मंत्री राहिलेले जयसिंगराव गायकवाड हे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्याचा दौरा करत आहेत. ते गुरूवारी 2 वाजण्याच्या सुमारास माजलगाव तालुक्यातील तालखेड या ठिकाणी भेटीगाठीच्या निमित्ताने आले होते. त्यांनी गावात प्रवेश करताच काही मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली, त्यांना खाली उतरण्यास मज्जाव करण्यात आला. तसेच आमच्या गावात व दारात येऊ नका, म्हणलं तरी कशाला येता रे नेते, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, सग्यासोयऱ्यांचा आरक्षणात समावेश केला जात नाही, तोपर्यंत आम्ही नेत्यांना गावात फिरकू देणार नाहीत, असे म्हणत सोपान शिंदे, दत्ता गवळी, श्रावण गवळी, गणेश कदम, अशोक कोठुळे आदींनी त्यांना गाडीतून खाली उतरूच दिले नाही.
युवकांचा रुद्र अवतार पाहताच माजी केंद्रीय मंत्र्यांना आपली गाडी परत फिरवावी लागली. गाडीतून खालीही न उतरताच तालखेड मधून त्यांना काढता ! ! पाय घ्यावा लागला. याचा व्हिडिओ वायरल झाल्याने याची चांगलीच चर्चा रंगली आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा