इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इंदापूर तालुका महिला संघटकपदी अश्विनी ज्ञानेश्वर साठे यांची निवड करण्यात आली. महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसाळकर यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.
इंदापूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटकपदी आपली निवड करण्यात येत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती फौजिया खान, महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रोहिणी खडसे, सौ. भारती शेवाळे (पुणे जिल्हा अध्यक्षा) यांना अभिप्रेत असणारी पक्ष संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल.
पक्ष बळकट व मजबुत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे निवडी प्रसंगी बोलताना अश्विनी ज्ञानेश्वर साठे यांनी सांगितले.
फोटो - अश्विनी ज्ञानेश्वर साठे
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा