*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी या गावात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ शेखरभैय्या खिलारे,किरण भांगे,महेशभाऊ शिंदे,अविनाशभैय्या सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांताधिकारी विजया पांगरकर यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला सदर घटने बाबत सविस्तर वृत्त असे की गडमुडशिंगी गावातील काही जातीयवादी नराधमांकडून गावातील चौकात का आला? या कारणाने बौद्ध समाजातील तीन अल्पवयीन व एक सज्ञान अशा एकूण चार मुलांना अतिशय अमानुषपणे हॉकीस्टिक सारख्या वस्तूंनी मारून जीवघेणा हल्ला केला आहे. या गंभीर प्रकरणात मुख्य आरोपींना पोलिसांनी पोलीस कोठडी न घेता एम.सी.आर झाला आहे.तो कसा झाला या विषयी चौकशी करण्यात यावी.या प्रकरणात ॲट्रॉसिटी दाखल झाली की नाही याचा खुलासा करण्यात यावा.
त्या गावातील मुलांचे कुटुंब आणि संपूर्ण समाज भयभीत झाल्यामुळे आरोपींना जामीन मंजूर होऊ नये.त्या आरोपींची पूर्वीची क्राईम चौकशी करण्यात यावी. त्यांच्यावर मोक्का अतर्गत गुन्हा दाखल करावा.शासनाने त्या मुलांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी सोमवार दि ११/०३/२०१४ रोजी प्रांताधिकारी यांना निषेध निवेदन देण्यात आले त्यावेळी विद्रोही नेते बच्चन साठे,शिवराम गायकवाड,विद्रोही अध्यक्ष पप्पूभाऊ मिसाळ,कन्हैया ठोंबरे,करण ठोंबरे,शंकरनाना मस्के,तुषारभाऊ केंगार,रोहित साठे,गणेश भालशंकर,अभिषेक भारती इत्यादी उपस्थित होते. सदर निवेदन मा.प्रांत अधिकारी यांनी स्विकारले.आसुन चौकशी साठी संबंधितांना पाठवून देण्यात येईल असे आश्वासन दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा