*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. त्यांच्या अटकेनंतर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, मी खूप नाराज आहे.' म्हणून मी नाराज आहे…
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर बोलत असताना अण्णा हजारे म्हणाले, 'अरविंद केजरीवाल यांच्यासारखा माणूस माझ्यासोबत काम करायचा याचे मला खूप वाईट वाटते. मद्याविरोधात आम्ही आवाज उठवला होता, आज तेच मद्य धोरण बनवत आहेत. याचे मला वाईट वाटले. पण एक काय करणार, सत्तेसमोर काही चालत नाही. त्यांच्या कामामुळे त्यांना अटक करण्यात आली. जे काही होईल ते कायदेशीररित्या केले जाईल, सरकार ते बघेल, विचार करेल.'
अरविंद केजरीवाल एकेकाळचे अण्णा हजारे यांचे पट्टशिष्य होते. पण दोघांच्यात दुरावा निर्माण झाला.
आपची जोरदार निर्देशने
केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आपने शुक्रवारी दिल्लीत जोरदार निर्देशने सुरु केली आहेत. केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात केल्या जाणाऱ्या निदर्शनादरम्यान दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना पोलिसांनी दिल्लीतील आयटीओ येथे ताब्यात घेतले. केजरीवाल यांच्या अटकेनंतर तैनात केलेल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल बोलत असताना डीसीपी सेंट्रल एम हर्ष वर्धन म्हणाले, 'आम्ही विशेषत: न्यायालयाच्या आसपासच्या सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले आहे. डीडी मार्गावर कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कारण इथे महत्वाची कार्यालये आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा