*टाइम्स 45 न्युज मराठी
*मो.9730 867 448
छत्रपती शाहू मार्ग असणाऱ्या ,आणि कोल्हापूर रोडवरून 100 फूट रोडवर प्रारंभ होणाऱ्या एका रेग्युलर गर्दी असणाऱ्या प्रमुख चौकाजवळ भव्य असणाऱ्या एका कॉम्प्लेक्स मध्ये सर्वात वरच्या मजल्यावरील कार्यालयात विमानतळावर "तिकीट तपासनीस च्या नावाखाली तरुणींना सेक्स स्कँडल च्या गर्तेत ढकलण्याचा धक्कादायक प्रकार सुरु असल्याचे समजते .
आज बेरोजगारी वाढली आहे .त्यामुळे 50000 रुपये पगार मिळत असेल आणि तशी कोणी जाहिरात करत असेल तर कोणीही निश्चित प्रभावित होणारच !
प्रारंभी "2000 रुपये" भरून तरुणींना बोलावण्यात येते .तरुणींना मुंबई - पुण्यात विमानतळावर नोकरीं आहे असे सांगून येथील अधिकारी 4 - 5 तास मोटिव्हेशन करतो. त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून 4-5 दिवसासाठी तरुणींना प्रशिक्षण आहे असे सांगत दुसरीकडे नेले जाते .त्यानंतर खरा "धक्कादायक" प्रकार सुरु होतो .
ज्या तरुणींनी विमानतळावर तिकीट बुकिंगचे स्वप्न पाहिलेले असते ,तेथे त्यांना टी.शर्ट .आणि कपडे विक्री चे फायदे सांगण्यात येतात . तब्बल 4 दिवसात त्यांना कापडं विक्रीतून भविष्यात तुम्ही लाखो रुपये तुम्ही मिळवू शकता हे "बिंबवले" जाते .त्यानंतर त्या तरुणींची मानसिकता विकसित करून पुन्हा सांगलीत आणण्यात येते .सांगलीत आल्यानंतर तरुणींना आपल्या पालकांना बोलावून त्यांना "45000 रुपये" घेऊन या ...असा निरोप देण्यात येतो .पालकांचा समज होतो ,बहुदा मुलगी एयर होस्टेस होईल ,विमानात काम करेल म्हणून पालक 45000 रुपये घेऊन येतात. त्यानंतर ते पैसे घेऊन त्या कंपनीचे लोक त्या तरुणींना कपड्यांचे बॉक्स देतात.
विमानतळाचे स्वप्न पाहणाऱ्या मुली,कपडे घेतात,पण त्यांच्या नंतर लक्षात येते की आपली पद्धतशीरपणे घोर फसवणूक झाली आहे. आणि आपण फसलो आहे..कमी प्रतीचे असणारे कपडे विकले जात नसतात आणि आपली मुलगी कपडे विकत आहे याचा पालकांना "थांगपत्ता": ही नसतो.
पालकांची स्वप्ने ,फसवणूक आणि कपड्यांची न झालेली विक्री ,पालकांचे "45000 रुपयांचे झालेले "आर्थिक नुकसान" यामुळे या तरुणी भांभावतात, घाबरतात . याच वेळी या कंपनीचे इतर कर्मचारी या तरुणींना वाममार्गाला जाण्याचा चुकीचा मार्ग सांगतात. कमी वेळेत जास्त पैसा मिळवून पालकांना पैसे देण्याचा फंडा सांगून "सेक्स स्कँडल" च्या "भुलभुलैय्यात" अडकवण्याचा व मोठमोठी स्वप्ने दाखवून या अबाल तरुणींना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो ! ज्या तरुणी "सावध" असतात ,त्या सर्वस्व गमावण्याआधी पालकांना सविस्तर सांगतात व आपली सुटका करून घेतात आणि पर्याय नसणाऱ्या तरुणी यात अडकतात. महागाई ,बेरोजगारी वाढली आहे. पॉश कार्यालय थाटून भामटे फसवू शकतात . म्हणूनच "फसवणुकीच्या" या प्रकाराला अन्य तरुणी -मुली बळी"पडू नये ,तरुणी आणि त्यांचे पालक सजग आणि सावध व्हावेत या उदात्त दृष्टीकोनातून या लेखाचे "प्रयोजन" आहे . धन्यवाद !
इकबाल बाबासाहेब मुल्ला
(पत्रकार)
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली.
मोबाईल - 8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा