*अकलुज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथे युगंधर क्रीडा आणि सांस्कृतिक सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये पार पडला.दि.२० ते २३ फेब्रुवारी दरम्यान मैदानावर विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये रस्सीखेच, व्हॉलीबॉल,कबड्डी,खो-खो, क्रिकेट इ. खेळ प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दि.२६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये फिशपॉन्ड,प्रश्नमंजुषा,संगीत खुर्ची,पारंपारिक वेशभूषा तसेच सिनेमॅटिक डे,फॅशन शो इ. नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये ही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आणि आनंद घेतला.हा
युगंधर क्रीडा व सांस्कृतिक सप्ताह शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील आणि महाविद्यालयाचे प्रा.आर.जी. नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडला.तसेच कार्यक्रमासाठी प्रा.एस.आर.आडत,प्रा.एन.बी.
गाढवे,प्रा.पी.एस.पांढरे, इतर सर्व प्राध्यापक ,प्राध्यापकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा