Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३० एप्रिल, २०२४

*"रामदेव बाबा" यांच्या पतंजली प्रॉडक्ट --च्या दृष्टी आय ड्रॉप्स 14 उत्पादनावर बंदी*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे. पतंजलीला आणखी एक मोठा झटका बसला आहे. आता आलेल्या वृत्तानुसार पतंजलीच्या दिव्य फार्मसीच्या १४ औषधांच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड औषध विभागाच्या परवाना प्राधिकरणाच्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. 

       पतंजली अर्थात दिव्य फार्मसीचा उत्पादन परवाना निलंबित करण्यात आला आहे त्यामध्ये श्वासारि गोल्ड, श्वासारि वटी, दिव्य ब्रोंकोम, श्वासारि प्रवाही, श्वासारि अवलेह, मुक्ता वटी एक्स्ट्रा पावर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवामृत एडव्हान्स, लिवोग्रिट, आईग्रिट गोल्ड आणि पतंजली दृष्टी आय ड्रॉप या औषधांचा समावेश आहे.

      दुसरीकडे, बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेद ग्रुप कंपनीला जीएसटी इंटेलिजेंस डायरेक्टरेट जनरल, चंदीगड झोनल युनिटकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. जीएसटी विभागाने पतंजली फूड्सला कारणे दाखवा नोटीस पाठवून कंपनीकडून २७.४६ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट का वसूल केले जाऊ नये, हे सांगण्यास सांगितले आहे. 

     दरम्यान, ही कंपनी प्रामुख्याने खाद्यतेलाचा व्यवसाय करते. कंपनीने सांगितले की, कंपनीला कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि अधिकृत स्वाक्षरी करणाऱ्यांना २७,४६,१४,३४३ रुपयांची इनपुट टॅक्स क्रेडिटची रक्कम (व्याजासह) का वसूल केली जाऊ नये आणि दंड का लावला जाऊ नये, याची कारणे दाखवण्यास सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा