*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
शरद पवार यांनी दहा वर्षांमध्ये काय केले याचा हिशोब द्यावा, असे अमित शाह यांनी म्हटले होते. या विधानावर शरद पवार यांनी खोचक प्रतिक्रिया देत गुगली टाकली आहे. 1967 पासून मी राजकारणात आहे. त्यामुळे त्यापैकी नेमक्या कोणत्या 10 वर्षांचा तुम्हाला हिशोब हवा, असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी आपल्या खुमासदार भाषणाने उपस्थिताना प्रभावित केले.
राजकीय कारकीर्दीची सनावळ सांगितली
बारामती हा शरद पवार यांचे होमग्राऊंड आहे. या ठिकाणाहून पाठिमागाली अनेक वर्षे ते निवडणुका लढवत आहेत. तोच धागा पकडत शरद पवार म्हणाले, कन्हेरी येथे मी पहिल्यांदाच आलो नाही. सन 1967 पासून आतापर्यंत अनेक वेळा मी इथे आलो आहे, 67, 71, 72, 77, 80, 85, 90, 95, 2000 आणि तिथून पुढे चार वेळा मी या ठिकाणी आलो आहे. शरद पवार यांनी थेट सनावळ्या सांगत आपल्या राजकीय जीवनाचा पटच इथे उल्लेखला. पवारांच्या भाषणाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा प्रचार खऱ्या अर्थाने सुरु झाला.
कार्यकर्त्याचा थेट नावाने उल्लेख
शरद पवार यांनी भाषणादरम्यान एका कार्यकर्त्याला नावानिशी ओळखले. हा कार्यकर्ता काही बोलू इच्छित होता. या वेळी शरद पार यांनी त्यांना विचारले तुम्ही गुरीजी आहात काय? यावर या कार्यकर्त्याने होका दिला. हे गुरुजी म्हणजे पांडूरंग झगडे. पवार यांनी गुरुजींना वय विचारले असता त्यांनी 95 असल्याचे सांगितले. यावर आपण माझ्यापेक्षा वडील असल्याचे पवार म्हणाले.
आपल्या भाषणात शरद पवार यांनी अजित पवार यांनाही टोला लगावला. ते म्हणाले काही लोकांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह नेले. ते प्रकरण कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना नाव आणि चिन्ह कसे वापरायचे याबाबत सांगितले आहे. पण, आपल्याला वाद आणि संघर्ष वाढवायचा नाही. आपल्याला लोकांपर्यंत जायचे आहे. जनतेचे काम करायचे आहे. तुतारी हे चिन्ह लोकांच्या मनावर बिंबवायचे आहे. त्यामुळे आगामी काळात सत्तापरिवर्तन करण्यासाठी तुतारीचे बटन दाबात. ते बटण कसे दाबायचे ते कुणीतरी कालच सांगितले आहे असे म्हणत अजित पवार यांनाही तोला लगावला दरम्यान शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा