Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २० एप्रिल, २०२४

*दूरदर्शनच्या "लोगो "चे ही भगवीकरण --प्रसार भारती की प्रचार भारती -----जवाहर सरकार*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


सरकारी मालकीचे दूरदर्शन अर्थात डीडी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीच्या बोधचिन्हाचा रंग बदलून भगवा करण्यात आला आहे. "नव्या अवतारासह बातम्यांच्या नव्या प्रवासाला" असं डीडी न्यूज ने नवीन स्लोगन जाहीर केलं.

 मात्र आचारसंहिता सुरू असताना आणि लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच हा रंग बदलण्यात आल्यामुळे सत्ताधारी भाजपकडून होत असलेले भगवीकरण विरोधकांच्या टीकेचे लक्ष झाले आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते सन 1976 मध्ये दूरदर्शनच्या हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवरील भगव्या रंगातील पहिल्या बोधचिन्हाचे अनावरण झाले होते, तेव्हापासून आतापर्यंत दूरदर्शनच्या बोधचिन्हात भगवा, निळा व हिरवा असे रंग झळकत होते. मात्र आता हे बोधचिन्ह पूर्णपणे भगव्या रंगात बनवण्यात आले आहे डीडी न्यूज ने समाज माध्यमातून 16 एप्रिल रोजी एका व्हिडिओद्वारे हे नवीन बोधचिन्ह सादर केले. 

बोधचिन्हाचा रंग बदलण्याच्या कृतीवर प्रसार भारती चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी टीका केली आहे. राष्ट्रीय प्रसारण संस्था असलेल्या दूरदर्शन ने बोधचिन्हाचा रंग बदलून भगवा केला आहे हे भगवेकरण मला धोकादायक असल्याचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वाटत आहे. प्रसारभारती आता प्रचारभारती झाली आहे असेही त्यांनी X वर म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा