*अकलुज ---- प्रतिनिधी*
**केदार----लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील निमा संघटना,होमिओपॅथी संघटना व अश्विनी हॉस्पिटल अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने जीपी काॅन-२०२४ चे आयोजन कृष्णप्रिया हॉल अकलूज येथे करण्यात आले होते.
अकलूज पंचक्रोशीतील वैद्यकीय क्षेत्रातील असामान्य व्यक्तिमत्त्व,लाखो रुग्णांना जीवनदान देणारे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.एम.के इनामदार यांनी हाइपरटेंशन अँड जनरल प्रॅक्टिस या विषयावरती दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये उपयोगी असे मोलाचे मार्गदर्शन केले.निमा डे,होमिओपॅथी डे तसेच डॉ एम के इनामदार सर यांचा वाढदिवस याचे औचित्य साधून केक कापण्यात आला.तर डॉ.स्नेहल पताळे पाटील यांना राष्ट्रीय वैद्यकीय सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल व डॉ.सचिन केमकर यांना आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशनचा डॉ भारतरत्न आंबेडकर भारत भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल या वेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच एमबीबीएस पास झाल्याबद्दल
डॉ.पृथ्वीराज शिरीष रणनवरे,
डॉ.अथर्व विनोद शेटे,डॉ.आनंद सुभाष बंडगर या डॉक्टरांच्या मुलांचा सत्कार ही यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमात डॉ.पराडे पाटील यांनी निमा डे निमित्त तर डॉ.सौ.देशमुख मॅडम यांनी होमिओपॅथी डे निमित्त मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी नातेपुते ते नेवरे येथून बहुसंखेने डॉक्टरर्स उपस्थित होते.महिला डॉक्टरर्स बहुसंख्येने उपस्थित होत्या.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी निमाचे अध्यक्ष डॉ. शिरीष रणनवरे,निमा वुमन फोरमच्या अध्यक्षा डॉ.सौ.अंजली कदम व निमा टीम तसेच होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ. अभिजित राजे भोसले, होमिओपॅथी वुमन फोरमच्या अध्यक्षा डॉ.सौ.वैष्णवी शेटे व होमिओपॅथी टीम यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सौ.शुभांगी माने-देशमुख यांनी केली.तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.दिलीप पवार यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा