*अकलुज ---- प्रतिनिधी*
**केदार----लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
संग्रामनगर येथील श्री साईबाबा सेवा ट्रस्ट यांच्यावतीने श्री साई प्राणप्रतिष्ठाचा २७ वा वर्धापन दिन व श्री रामजन्म उत्सव सोहळा श्री साई मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.
श्री साईबाबा मंदिरात सकाळी पहाटे अभिषेक व महापूजा डॉ.रावसाहेब गुळवे व निखिल फुले यांच्या हस्ते करण्यात आली.विश्वशांती यज्ञ गजानन टेके यांच्या हस्ते अग्नी प्रज्वलीत करण्यात आला.दुपारी १२ वाजता श्री राम जन्मोत्सव व श्री साईबाबा यांची आरती क्रांतिसिंह माने पाटील व आप्पासाहेब पवार,सौ.सोनाली पवार या यांच्या हस्ते करण्यात आली.त्या नंतर सर्व उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी भक्ती गीते व आरतीही झाली.श्री साईबाबा सेवा ट्रस्टचे अध्यक्ष किशोरसिंह माने पाटील, हनुमंतराव खडके,सचिव राजेंद्र आर्वे,देवचंद ओसवाल,आदेश शहा,अरुण राऊत,चंद्रकांत कुंभार,अजित राखले,अशोक गुजर,विजय टोंगळे,उमेश शेटे, बाळासाहेब सणस,जयंत कुलकर्णी,अजित माने,सुभाष काळे यांचे सह लोकमान्य गणेश मंडळ,शिवरत्न गणेश मंडळ व शिवगर्जना ग्रुप यांचेही सहकार्य लाभले.त्याचबरोबर धवल श्रीराम मंदिरातही राम जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर अकलूज व शंकरनगर येथील मारूती मंदिर या ठिकाणीही रामजन्मोत्सव धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा