मुख्यसंपादक---हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
अकलूज येथील सर्वसामान्य कुटुंबातून येणारा आणि बालपणापासून पोटासाठी संघर्ष करणारा शिवाय सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेला व अकलूज चे माजी उपसरपंच-" पांडुरंग भाऊ देशमुख "यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अकलूज शहराध्यक्ष "सुरेश भाऊ शिवाजी गंभीरे" हा युवक दिनांक 30 मार्च 2024 रोजी अकलूज येथील माळीनगर रोड वरील शाही मस्जिद कब्रस्तान येथे रोजा इफ्तार साठी आले असताना "टाइम्स 45 न्यूज चे संपादक --हुसेन मुलाणी "यांनी त्यांच्याशी रोजाबाबत घेतलेली मुलाखत
सुरेश शिवाजी गंभीरे हे मागील 25 वर्षापासून म्हणजेच वयाच्या 28 वर्षापासून निरंतर मुस्लिम समाजाचे रमजानचे संपूर्ण महिन्याचे रोजे करत असून त्याच्या या आध्यात्मिक कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
आज संपूर्ण देशात पाहिले तर सर्वत्र जातीवादाचे राजकारण फोफावत असून अशा परिस्थितीत अकलूज मधील एक हिंदू युवक मुस्लिम समाजाचा आदर राखून तो रमजानचे महिनाभर रोजे करत असून या युवकाचे कार्य म्हणजेच समाजासमोर एक आदर्शच आहे शिवाय या कार्यामुळे समाजात जातीयवादाचे विष पेरणाऱ्यांना एक प्रकारे चपराक असुन देशाला आज अशाच युवकाची गरज असून अशा युवकामुळे समाजातील जातीय विषमतेची दरी दूर होण्यास मदत होणार आहे
मुस्लिम धर्मात रमजानचे रोजे केले जातात मात्र त्यासाठी पहाटे उठून सहेरी करणे म्हणजेच अल्पहार घेणे आणि अनिवार्य असते मात्र सुरेश गंभीरे हे सहेरीला फक्त एक खजूर आणि दोन चमचे दही घेऊन रोजाला प्रारंभ करतात विशेष म्हणजे आज आशा रखरखत्या उन्हात केवळ एक खजूर आणि दोन चमचे दहीवर दिवसभर रोजा (उपवास) करणे म्हणजे जिकरीचे आणि आव्हानात्मक आहे अशा या अवलियास सलाम (मानाचा मुजरा)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा