नूरजहाँ शेख -उपसंपादिका
टाइम्स 45 न्यूज मराठी
लवंग २५/४ येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला . एकमेकांच्या चहे-यावर विविध रंग लावून रंगपंचमी सणाचा बाळ गोपाळांनी मनमुराद आनंद शाळेत लुटला .
काल रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी होती पण आज सकाळी मुले शाळेत आल्या नंतर विविध रंगांची उधळण करत एकमेकांना रंग लावून इको फ्रेंडली रंगपंचमी सणाचा आनंद घेतला.त्यामुळे मुलांचा आनंद व्दिगुणित झाला होता.
यावेळी संस्थेच्या संचालिका नूरजहाँ शेख यांनी सांगितले की,मुलांना लहान वयात आपल्या पारंपरिक सणाची जवळून ओळख व्हावी म्हणून या शाळेत नेहमी सण समारंभ साजरा केला जातो. विविध रंगांची उधळण करून रंगपंचमी सणाचा मुलांनी मनसोक्त आनंद घेतला .




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा