Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १७ एप्रिल, २०२४

*सोलापूर मध्ये कारमध्ये सापडली 7.50 लाख रुपयाची रोकड..* *रक्कम कोणाची अन कोठे चालली होती?* *सलगर वस्ती पोलिसांकडे रक्कम जमा*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


साेलापूर : लोकसभा २०२४निवडणुकीच्या अनुषंगाने शहर- जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करण्यात आली आहे. कोल्हापूरहून सोलापूर शहरात येणाऱ्या कारला देगाव नाका परिसरात अडविण्यात आले. त्यावेळी कारमध्ये कोणतीही कागदपत्रे, पुरावा नसलेली साडेसात लाखांची रोकड सापडली. ती रक्कम सलगर वस्ती पोलिसांत जमा करण्यात आली आहे.



शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील देगाव नाका येथील स्थिर सर्वेक्षण पथकाने ही रोकड जप्त केली आहे. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास कोल्हापूरहून सोलापूरच्या दिशेने कार (एम.एच. ०८, ऐ.जे. ६००७) येत होती. कारची झडती घेतली असता डिकीतील पिशवीत साडेसात लाख रुपयांची रोकड आढळून आली. रकमेबाबत विचारणा केल्यावर चालक अजय मोहन चव्हाण 

(रा. वाडकर गल्ली, कोल्हापूर) 

याने युवराज मारुती भिंगोडे यांना माझी क्रूझर गाडी (एम.एच. ०९, डी.एक्स. २०३०) विकली असून त्याचे पैसे घेऊन अक्कलकोट मधील दुसरी गाडी खरेदीसाठी जात असल्याचे सांगितले. परंतु, रकमेसंदर्भात कोणताही वैध पुरावा न मिळाल्याने रक्कम सर्वेक्षण पथकाने सलगर वस्ती पोलिसांत जमा केली.


ही कार्यवाही उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 

विठ्ठल उदमले, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार 

किरण जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील देगाव येथील स्थिर सर्वेक्षण पथकाचे प्रमुख विष्णू गायकवाड, सहायक 

राजेश साळी, पोलिस हवालदार कुणाल बनकर, ज्ञानेश्वर चव्हाण, व्हि.डि.ओ.ग्राफर विशाल पांढरे यांनी केली.


*रक्कम बॅंकेतून काढल्याचाही नाही पुरावा*


अक्कलकोट येथील चारचाकी प्रवासी वाहतूक वाहन खरेदी केले असून, त्या मालकाला देण्यासाठी ही रक्कम आणल्याचे चालकाने सर्वेक्षण पथकाला सांगितले. 

पण, जप्त रकमेतील पाचशे रुपयांच्या १४०० नोटा, 

२०० रुपयांच्या २०० नोटा,

शंभर रुपयांच्या १०० नोटा कोठून आणल्या, कोणत्या बॅंकेतून काढल्या आहेत, त्या व्यवहाराचा तपशील आहे का?, यासंदर्भात कोणताही पुरावा संबंधिताकडे नव्हता. त्यामुळे तूर्तास ही रक्कम पोलिसांत जमा असणार असल्याची माहिती अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा