*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
"शादी खाना "अर्थात "विवाह मंगल कार्यालय" यामध्ये विवाहासाठी 20 हजार ते 50 हजार पर्यंत भाडे आकारले जाते. गरजवंत अथवा गरीब मुस्लिमांसाठी ते परवडणारे नसते. अशा परिस्थितीत त्यांना लग्नकार्यासाठी अथवा शुभकार्यासाठी माफक दरात अथवा मोफत हॉल भाड्याने मिळाला तर???
गोरगरीब - गरजवंत मुस्लिमांसाठी मुलीचे लग्न म्हणजे "पहाड" उचलण्यासारखे असते .अन्य खर्चासह शादीच्या हॉल चा खर्च न परवडणारा असतो. जर मुस्लिमांसाठी माफक दरात,शादी हॉल मिळाला तर त्या मुलीच्या वडिलांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे निश्चित कमी होईल. सांगलीसह संपूर्ण
"महाराष्ट्रातील ईदगाह मध्ये वर्षातून 2 वेळा " रमजान व बकरी ईद" चे नमाजपठण होते. जर 12 महिन्यातील 2 वेळ सोडून राहिलेल्या इतर 363 दिवशी हें मैदान मोकळे असते. "विधायक दृष्टीकोनातून" जर या "ईदगाह" वर शादीखाना बांधला गेला व माफक दरात गोरगरीब मुस्लिमांसाठी लग्नासाठी दिला तर ???
वर " स्लॅप बांधून" समोर एकच भिंत बांधून आजूबाजूला भिंत न बांधता ओपन स्वरूपात तो बांधला गेला तर ईदगाह मध्ये रमजान व बकरी ईद मध्ये "वृद्ध" व्यक्तींना उन व पावसापासून दिलासा व "संरक्षण" देखील मिळेल.
ईदगाह मध्ये हॉल साठी ज्यांना स्वइच्छेने पैसे द्यायचे असतील त्यांनी आवर्जून पैसे द्यावेत ,परंतु ज्यांना पैसे देणे शक्य नाही अशा लोकांनी माफक पैसे" देऊन "शुभकार्य" पार पाडू शकतात.
आज "शामरावनगर" येथे मुस्लिम समाजाचा "बिरादरी हॉल" डोलाने उभा आहे.
माझे हितचिंतक -मित्र माजी महापौर स्व. हारूण शिकलगार यांच्या अपार प्रयत्नाने एक - एक "चिरेबंदी वीट" रचली गेली. आणि प्रशस्त वास्तू आकारली गेली. परंतु व्यवहाराने तेथेही मुस्लिमांसह सर्वांना लग्नकार्यासाठी पैसे द्यावेच लागतात. गोरगरिबांसाठी 20- 25 हजार ही रक्कम फार मोठी असते. वास्तविक घरपट्टी-- पाणीपट्टी याचा खर्च असतो. तो याच भाड्याच्या पैशातून काढला जातो हें वास्तव आहे . बिरादरी हॉल मध्ये काही लोकांना खास सवलत दिली जाते. सर्वांसाठी ही सवलत नसते.
बागवान बांधवांनीही पेठभाग येथे छोटेखानी शादीखाना स्थापन केला आहे. तेथेही विवाहासाठी "पैसे"आकारले जातात. विवाह हॉल साठी येथेही बागवान समाजाच्या बांधवांसाठी पैशाची खास सवलत दिली जाते. "बागवान फेडरेशन" च्या माध्यमातून गरजू व प्रामाणिक तरुणांसाठी कर्ज पुरवठा केला जातो. गरजवंत बिरादरी साठी मदत असो किंवा कर्ज बागवान व बिरादरी बांधव अत्यंत व्यवहारचातुर्याने "प्रगतीपथावर" आहेत.
बागवान बांधव, बिरादरी बांधव छोट्याशा समूहातून आपापली आदर्शवत व उल्लेखनीय "प्रगती" करत असतील तर त्यांचा "आदर्श" बहुसंख्य समस्त मुस्लिम समाजाने घ्यायला नको का ???
या बांधवांचा "आदर्श" नजरेसमोर ठेवून समस्त मुस्लिम समाजासाठी "मोफत" असणारे कोणते व्यासपीठ आहे का ?? समस्त मुस्लिम समाजासाठी ,त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आपण कोणती "उपाय योजना" केली आहे का ??? कर्जपुरवठा माफक दराने करून त्या नवउद्योजकाला आर्थिक सम्पन्न करण्यासाठी कोणते पाऊल उचलले आहे ??? निदान आता तरी समस्त मुस्लिम समाज जागा होणार का ?? आपल्या प्रगतीसाठी प्रयत्नशील होणार का ???
सांगलीसह महाराष्ट्रातील सर्व "ईदगाह मैदानावर" एखादे शादी हॉल बांधले तर सर्वसाधारणपणे 40-50 हजारमुस्लिम बांधवांसाठी वाळवंटातील "ओऍसिस" प्रमाणे "दिलासा" मिळेल. आणि "दुवा व आशीर्वाद" मिळतील.
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध,
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा