उपसंपादक -नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस तालुक्यातील गणेशगांव येथील भीमरत्न तरुण मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरात वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले.
गणेशगांव येथील भीमरत्न तरुण मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रक्तदान सारखा सामाजिक उपयोगी उपक्रम राबवून ग्रामीण भागात आगळा वेगळा कार्यक्रम करून साजरी केली.सोलापूर येथील अक्षय ब्लड बँकच्या वतीने रक्त संकलीत करण्यात आले होते.रक्तदान करणा-या रक्तदात्यांना ब्लड बँकेच्या वतीने पाण्याचा जार, सोलापूरी चादर व ब्लूटूथ देण्यात आले.
भाईसाब वजीर शेख पोलिस पाटील (गणेशगांव) यांनी वडील वजीर शेख यांच्या प्रथम पुण्यास्मरण निमित्त सर्वप्रथम रक्तदान करून शुभारंभ केला.या कार्यक्रमाला माजी सरपंच दादासाहेब नलवडे,पोलीस पाटील भाईसाब शेख,सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार नूरजहाँ फकरुद्दिन शेख,भीमरत्न तरूण
मंडळाचे अध्यक्ष मारूती भोसले, खजिनदार दादासाहेब जगताप, सदस्य कुंडलीक ठोकळे,फकृद्दीन शेख , विशाल बाबर,आमर ठोकळे,आबासाहेब बाबर,,आकाश ठोकळे,ऋषीं ठोकळे,आनंद ठोकळे,सागर ठोकळे,योगेश दळवी,किसन ठोकळे,किरण ठोकळे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. गणेश यादव यांनी रक्तदात्यास अल्पोपहार वाटप केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा