Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ६ एप्रिल, २०२४

*माढा लोकसभा निवडणुकीची प्रशासकीय यंत्रणा सज्ज- प्रांताधिकारी:- विजया पांगारकर*

 


*उपसंपादिका---नुरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्युज मराठी


माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली असून निवडणुकीसाठीचे पहिले प्रशिक्षण उद्या शनिवार दि.६ एप्रिल रोजी पासून सुरू होत असल्याची माहिती प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिली.

         लोकसभा निवडणुकीसाठी ज्या प्रशासकीय तयारी बाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत प्रांताधिकारी पांगारकर बोलत होत्या. यावेळी माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजूळ,नायब तहसिलदार अमोल कदम,सहाय्यक गट विकास अधिकारी किरण मोरे,विस्तार अधिकारी रेखा डोके उपस्थित होते.

           प्रांताधिकारी पांगारकर पुढे म्हणाल्या की,माळशिरस तालुक्यात ३३८ मतदान केंद्र असून १ लाख ७५ हजार ३० पुरुष मतदार, १ लाख ६१ हजार ८०२ स्त्री मतदार तर ३१ तृतीयपंथी मतदार असे एकूण ३ लाख ३६ हजार ८६३ मतदार आहेत. त्याचबरोबर ४२१ सैनिक मतदार आहेत.या मतदार संघासाठी ऐन उन्हाळ्यात ७ मे रोजी मतदान असल्याने आवश्यक त्या ठिकाणी मंडपाची सोय करण्यात येणार असून सर्वच मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाणार आहे. 

काही गावात एकाच इमारतीत जास्त बुथ असल्याने मतदाराची धावपळ होऊ नये यासाठी कलर कोड वापरण्यात येणार आहेत. तसेच विशेष योजनेअंतर्गत फक्त महिला कर्मचारी असणारे बुथ माळशिरस व सदाशिवनगर येथे करणार असून दिव्यांगाने चालवलेले बुथही नातेपुते येथे असणार आहे. तर बचेरी येथील बुथ फक्त तरुण चालवणार आहेत.

              सध्या चार भरारी पथके कार्यान्वित असून पाच चेक पोस्ट ( तपासणी नाके) तयार करण्यात आले आहेत.संपर्क अधिकारी,क्षेत्रीय अधिकारी,स्थिर निरीक्षण पथक,आचारसंहिता कक्ष,बिडीओ पथक,पोस्टल अधिकारी असे एकूण ५०० कर्मचारी कार्यरत असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

मतदान प्रक्रियेसाठी केंद्राध्यक्ष ६४२ प्रमुख अधिकाऱ्यांसह एकूण २३१३ कर्मचारी वर्गांसाठी क्लासरूम ट्रेनिंग व नंतर मशीनचे ट्रेनिंग स्मृतीभवन व महर्षी प्रशाला येथे शनिवार दि.६ एप्रिल ते सोमवार दि.८ एप्रिल रोजी दरम्यान होणार असून एकूण ६ सत्रांमध्ये हे प्रशिक्षण होणार आहे.तसेच मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना सोडण्यासाठी व आणण्यासाठी ५२ बसेस व १३ क्लुजर वाहनांची सोय करण्यात आलेली आहे.असेही प्रांताधिकारी पांगारकर यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा