*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख हे लेखन, दिग्दर्शन, गीतकार या पाठोपाठ आता म्युझिक दिग्दर्शन या नव्या रूपाने आपल्यासमोर येत आहेत. त्यांनी काल फेसबुक आणि इंस्टाग्रामवर त्याबाबत पोस्ट केली.
अल्ताफ शेख यांच्या 2018 मध्ये रिलीज झालेल्या "वेडा बी.एफ." सिनेमातील "हे माझे दुर्वेश बाबा" या गाण्याची चक्क वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
त्यांनी आगामी हिंदी चित्रपट "लोरी" चे गीत लेखन केले असून चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन अल्ताफ शेख यांच्यासोबत सुधीर कुमार हजेरी लखनऊचे या दोघांनी मिळून सांभाळले आहे.
प्रसिध्द गायक सुरेश वाडकर, उर्मिला धनगर, स्वप्निल बांदोडकर, प्रियांका बर्वे आणि अंजली गायकवाड यांनी या चित्रपटाची गाणी गायली आहेत; ओम साई राम क्रिएटिव्ह वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता अविनाश कवठणकर असून; दिग्दर्शन राजू रेवणकर यांचे आहे. डीओपी कुमार डोंगरे, पणती पटेल, राजकुमार, शान कक्कर, रंजीत दास, अभिलाषा घैरा, प्रतिभा शिंपी, आरती शिंदे; तर आर्ट- राजू माळी, मेकअप- केतन, कॉस्ट्यूम- संगीता चौरे आणि आरती पाटील कुलकर्णी, लाइन प्रोड्यूसर- शाहजहां शेख, प्रोडक्शन मैनेजर- अमजद खान शेख, किरण घोडके, अभिषेक चौरे हर्ष राजे मेकअप डिपार्टमेंट किरण सिद्दीद्दी
आहेत. हिंदी आणि मराठीतले अनेक कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा