*अकलुज ---- प्रतिनिधी*
**केदार----लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूजमध्ये गेल्या ७० वर्षीची कावडी उत्सवाची परंपरा जपत भक्ती भावाने देवांग कोष्टी समाजाच्या वतीने कवडीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.जुन्या रूढी व परंपराने हा सोहळा चालू ठेवण्याचे काम करत आहे.
७० वर्षांपूर्वी जगन्नाथ महादेव टेके यांनी कावडीची परंपरा चालू केली होती.त्यांच्या नंतर सुभाष जगन्नाथ टेके यांनी पुढे चालू ठेवली होती त्यांच्या पश्चात हेमंत सुभाष टेके,आकाश हेमंत टेके व देवांश (साहेब) आकाश टेके यांनी कावडीची परंपरा पाच पिढ्यांनी पुढे सुरू ठेवली आहे.हि कावड देवांग कोष्टी समाजाची असून टेके, भरते,सोनटक्के,उपरे,टकले,फासे,दौंडे,परिवारातील सर्व सदस्य व मित्र परिवार मोठ्या उत्साहात कावडी सोहळ्यात सहभागी होतात.
पाडव्याच्या दिवशी कावडीला कपडे चढवून अकलूज गावामधून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते त्यानंतर कावडीमध्ये निरा नदीचे पाणी भरून महादेव मंदिरातील पिंडीला जल अभिषेक घालण्यात येतो. पुन्हा एकदा एकादशीला महादेवाच्या पिंडीला जल अभिषेक घातला जातो.तिसरा जल अभिषेक पोर्णिमेच्या दिवशी महादेवाच्या पिंडीला घातला जातो.पोर्णिमेच्या दिवशी हेमंत टेके यांच्या निवासस्थानी कावडीचे भक्ती भावाने पूजन करण्यात येते.नंतर भाविकांना अंबिलाचा प्रसाद वाटला जातो.त्यानंतर कावडीला महाप्रसादाचा नैवेद्य दाखवून कावडीचे मानकरी यांची पहिली पंगत बसवली जाते.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात येते.नंतर कावडीचे कपडे उतरविले जातात.यावेळी दिड हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
हि परंपरा जपण्याचे काम हेमंत सुभाष टेके परिवाराबरोबर देवांग कोष्टी समाजाचे विलासराव भरते,रविंद्र टेके,सुनिल टेके, बाबुराव उपरे,पांडुरंग टेके विलास टकले करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा