💺*खुर्ची*💺
खुर्ची पायी युद्ध झाले सुरु
चला आता फॉर्म भरू
फायनल चिन्ह करू
फायनल चिन्ह करू !!
सभा घेऊ भाषण देऊ
ताक देवु लोणी खाऊ
हात जोडू पाय पकडू
नोट देऊ वोट घेऊ !!
बाटल्या बकरं वाटत फिरू
जोरदार पार्ट्या आता करू
दारोदार हात जोडत फिरू
असा प्रचार जोरदार करू !!
आता तिजोरी मोकळी करू
निवडून येता पुन्हा भरू
चला आता दारोदार फिरू
खुर्चीपायी वाट्टेल ते करू
लोकशाही चे युद्ध झाले सुरु
जनतेचे पायही आता धरू !!
टोप्या घालू आणि फिरवू
चेल्यास ही आता म्हणू गुरु
लोकशाहीचे युद्ध झाले सुरु
खुर्ची पायी वाट्टेल ते करू.
*कवयित्री*
*नूरजहाँ फाकृद्दीन शेख*
गणेशगांव ता.माळशिरस
जि.सोलापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा