*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
(1) आपण केंद्र व राज्य सरकारमधिल अल्पसंख्याक विकास विभागाचे बजेट व नव्या आवश्यक योजना निर्मितीसाठी काय करणार.
(2) गेली 2 वर्षे केंद्र सरकारने अल्पसंख्याक विभागाचे बजेट 2000 रु.ने कमी केले. बरेच स्काॕलरशिप बंद केल्या यावर आपण व आपल्या पार्टिनै सरकारला काही सुद्धा विचारले नाही. ज्यामुळे प्राथमिक.माध्यमिक,महाविद्यालयीन शिक्षणामध्ये विद्यार्थी गळती वाढली आहे.
(3)अल्पसंख्याक हक्क दिन कधी असतो? आपल्या राजकीय जीवनात ह्या दिननिमित्त आपण कधी कार्यक्रमात सहभागी होवुन अल्पसंख्याकांचे समस्यावर शासनाकडे काय मागण्या केल्या?
(4) पंतप्रधान 15 कलमी अल्पसंख्याक विकास कार्यक्रम व सरकारी योजना अल्पसंख्याकापर्यंत पौहचणेसाठी काय काम केलै?
(5) धर्माप्रमाणे प्रार्थना करणे हा संविधानीक अधिकार असताना अनेक वर्षापासुन नवीन मस्जिद, निर्मितीचे परवानगीला ला कडक निर्बंध लावुन अल्पसंख्याकांचे स्वातंत्र्यावर गदा आणली गेली आहे, या समस्येवर उपाय योजना करणेसाठी कधी काय प्रयत्न केले.
(6) आता मस्जीदीवर हेतुपुर्वक बुलडोजर फिरवुन समाजात अशांतता पसरवण्याचे काम चालु आहे, यावर संविधानीक हक्क, अधिकार, स्वातंत्र्यासाठी काय प्रयत्न केले.
(7) काँग्रेसच्या सरकारने प्रत्येक शासन योजना, निधीमध्ये 15% निधी अल्पसंख्याकासाठी असे धोरण असलेला शासन निर्णय केला पण त्याच्या वर काम झाले नाही व सध्या तर असा निर्णय रद्द करणेत आला आहे. तर पुनश्च अशा आरक्षित निधीसाठी आपण काय करणार?
(8) काँग्रेसच्या काळातील राज्यातील पहीला माँबलिंचींग मृत मोहसीन शेख पासुन नुकताच पूसेसावळी ,सातारा. व इतर शहर गावामधील दंगलीत मृत झालेल्यांना आणि नुर हसन यांचे वारसांना शासनाने 1रु ची ही मदद दिलेली नाही. तसेच दंगलग्रस्त दुकानदारांना सुद्धा कसलीही मदद मिळाली नाही. या प्रकरणात आपण शासनाशी काय पत्रव्यवहार तरी केला काय ?
(9) कित्येक वर्षे अल्पसंख्याक आयोग, मौलाना आझाद महामंडळ, जिल्हा अल्पसंख्याक विकास संनियंत्रण समित्यावर अशासकिय सदस्य, चेअरमन यांचे नियुक्त्या केल्या नाहीत. यावर आपण किंवा आपल्या पार्टिनै काय प्रयत्न केले काय ?(10)अल्पसंख्याक विकास विभाग, केंद्र व राज्याचे बजेट बाबत मोठा अन्याय समाजावर होतोय. यावर कधीही आपण किंवा आपल्या पार्टिने लक्ष दिले नाही. तसेच हे तोकडे बजेट पण खर्च केले जात नाही. समाजाला विकासा पासुन वंचीत ठेवण्याचे काम होतेय. आपण या विषयात कधी लक्ष घातले नाही..यापुढे काय करणार ?
(11) हिजाब बंदी बाबत अल्पसंख्याक समाजाचे संविधानीक हक्कावर गदा आणली जात असताना आपली भुमीका स्पष्ट का होत नाही ?
(12) मुस्लीम द्वैषी जातीयवादाला खतपाणी जाहीर भाषणे होत असताना आपली भूमीका स्पष्ट का नाही.? जातीयवादी व हेट स्पीच करणार्या वर, मस्जिदीवर तसेच मुस्लिम व्यवासायिकावर होणाऱ्या हल्ल्यानंतर कायदेशीर कारवाई साठी आपण किंवा आपला पक्ष काय भुमिका घेणार?(13) मुस्लीमां चे शिक्षण, संरक्षण, व आरक्षण बाबत आपली भुमिका काय असेल व याबाबत मूस्लिमांना न्याय देणेसाठी आपण काय करणार......?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा