*अकलुज ---- प्रतिनिधी*
**केदार----लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिर संग्रामनगर (ता.माळशिरस) येथे भगवान श्रीराम प्रभूंचा जन्मोत्सव विविध सामुदायिक उपासना व उपक्रमाने संपन्न झाला.
चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते श्रीराम नवमी पर्यंत नऊ दिवस रोज पहाटे पाच ते सहा वाजता श्रीं ची काकड आरती तसेच " श्रीराम जयराम जय जय राम " या सिध्दतारक मंत्राचा अखंड जप, दुपारी विविध भजनी मंडळाची सुश्राव्य भजन सेवा, रोज सायंकाळी ६:३० ते ८:३० वाजता सामुदायिक स्वरूपात श्रीराम रक्षा स्तोत्राची सलग तेरा अवर्तन घेण्यात आली.
गुढी पाडव्याच्या दिवशी पहाटेच्या काकड आरती नंतर सकाळी ६:०० ते ७:३० वाजता कु.ईश्वरी धनंजय यादव यांच्या शुभहस्ते दुग्ध रूद्राभिषेक संपन्न झाला व श्रीराम नवमीच्या नवरात्रीच्या कलशाची स्थापना करण्यात आली.गुडी पाडवा ते श्रीराम नवमी पर्यंत रोज पहाटे काकड आरती,अखंड जप व ७० भाविकांच्या श्रीराम रक्षा आवर्तने या उपासनेमुळे संग्रामनगरचे वातावरण राममय झाले होते.
श्रीराम नवमीच्या दिवशी पहाटेची काकड आरती नंतर सकाळी ६:०० ते ७:३० वाजता सौ.व.श्री.अभय सुभाष जोशी यांच्या शुभहस्ते श्रीरामांच्या मुर्तीस,श्री दत्तात्रय व श्रीकृष्णाच्या मुर्तीस दुग्ध रूद्राभिषेक संपन्न झाला.सकाळी ८:०० ते १०:०० या वेळेत श्रीराम कृपा भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला.व सकाळी १०:०० ते १२:०० या वेळेत किर्तनाचा कार्यक्रम झाला.किर्तन विशारद हे.भ.प.सौ.गायत्रीदेवी जामदार याचे श्रीराम जन्मावर नारदीय किर्तन संपन्न झाले.दुपारी १२:३० वाजता पुष्पवृष्टी होऊन त्यानंतर पाळणार गायन व आरती करण्यात आली.दुपारी १:०० ते ३:०० वाजेपर्यंत सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.अशी माहिती सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज विश्वस्त मंडळाने दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा