Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १४ एप्रिल, २०२४

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिलेबी व आईस्क्रीम वाटप.*

 


*अकलुज ---प्रतिनिधी*

*केदार ----लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी


भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.



           अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर व नवीन बस स्थानक येथे आईस्क्रीम व जिलेबी वाटप कार्यक्रम पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला त्यानंतर गांधी चौक येथील दयावान वाहतूक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रतिमा पूजन व अन्नदान कार्यक्रमास महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी उपस्थिती लावून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून अन्नदान केले यावेळी दयावान वाहतूक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सदुभाऊ चौक येथील मंडळाला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष हेमंत कांबळे तालुका कार्याध्यक्ष संतोष गायकवाड तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे तालुका युवक कार्याध्यक्ष शिवम गायकवाड तालुका युवक सरचिटणीस तुषार केंगार अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे शहर उपाध्यक्ष साजिद बागवान आकाश गायकवाड युवक शहराध्यक्ष अशोक कोळी अकलूज शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे शहर उपाध्यक्ष अविनाश गायकवाड शेतकरी संघटनेचे शिवराम गायकवाड राष्ट्रवादीचे अविनाश सोनवणे चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायत सदस्य सचिन सोनवणे वैभव अंबुरे अभिषेक शिंदे आदेश थोरात रवी कोळी सागर कोळी यांचेसह इतर पदाधिकारी भीमसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा