Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

*पोहोरगाव ता.पंढरपूर येथे "डॉ.बाबासाहेब आंबेडकर" जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन*

 


*विशेष ----प्रतिनिधी*

 *एहसान ---मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9096 837 451


पोहोरगाव ता.पंढरपूर येथे बोधीसत्व ,महामानव ,भारतररत्न -डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त भीमशक्ती तरुण मंडळ पोहोरगाव यांच्या वतीने 3 दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन दिनांक 25एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता" के डी डान्स आॕकाडमी "यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भिमगितावर डान्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. व दिनांक 26एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्रातील महान प्रबोधनकार भिमशहीर बाबुराव गाडेकर आणि संच भोकर ता. नांदेड यांचा भिमप्रभोधनात्मकभिमगितचा कार्यक्रम आयोजित केला आहे तर दिनांक 27एप्रिल सायंकाळी सात वाजल्यापासून मोठ्या उत्साहात दिव्य आणि भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाचे सभासद अतुल वाघमारे. बाळासो वाघमारे. आण्णा वाघमारे. रामहरी वाघमारे यांनी दिली.

 तरी सर्वभीम प्रेमी नी य कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी आसे ही आवाहन करण्यात आले आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा