*विशेष----प्रतिनिधी*
*राजु (कासिम)मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी
भाटगर धरणातून पाणी सोडून अंदाजे 30 ते 35 दिवस होऊन गेले होते . माळशिरस तालुक्यात सर्व फाट्यास पाणी सोडण्यात आले होते परंतु माळशिरस तालुक्यातील 61 फाट्यास पाणी सोडण्यास अजतागायत पाटबंधारे खात्याने दिरंगाई केली होती शेतकऱ्यांच्या वतीने चाकोरे गावचे युवा नेते दादा पाटील यांनी अहोरात्र प्रयत्न केले परंतु राजकीय पूढाऱ्यांनी पाटबंधारे खात्यांचे अधिकारी यांना हाताशी धरून पाणी सोडण्यास विलंब लावला होता .युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व दादा पाटील यांनी पाटबंधारे खात्यास जलसमाधी घेण्याचा ईशारा देतास पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी 11 वाजता माळशिरस तालुक्यातील 61 फाट्यास पाणी सोडले त्यामुळे प्रतापनगर चाकोरे कचरेवाडी कोंडबावी माळशिरस आनंदनगर बागेवाडी गिरझणी वटपळी पाणीव या दहा गावातील शेतातील पिकांना जीवदान मिळाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे .यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे दादा पाटील शिवसेना विधानसभा तालुका प्रमुख महादेव बंडगर युवा सेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके दत्ताभाऊ साळुंखे, बापू कोळेकर,तात्या कोळेकर सुरेश चोपडे, किरण वाघमोडे, सुरेश पाटील, विकास पाटील, मोहन गायकवाड, तुकाराम पाटील, दतू पाटील, सचिन माने, सोमनाथ माने, राजेंद्र ढवळे, मोहन जाधव ई शेतकरी उपस्थितीत होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा