Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३० एप्रिल, २०२४

*मंगळवेढा येथील "रशीदभाई तांबोळी "यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड*

 


*विशेष ----प्रतिनिधी*

 *एहसान ---मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9096 837 451*

मंगळवेढा जि. सोलापूर येथील "रशीदभाई तांबोळी" यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाच्या 'उपाध्यक्षपदी '--निवड केल्याचे पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि इतर मान्यवर व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष 'वसीम रमजान पठाण' यांच्या उपस्थितीत देण्यात आले

   काँग्रेस पक्षाचे विचार ध्येयधोरणे, शिस्त, सहकार्य व स्वावलंबन या प्रेरणेतून सर्वधर्म समभाव, समता व बंधुता यामधून राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्यासाठी आपण कार्यरत राहणार असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष --मल्लिकार्जुन खर्गे , सोनिया गांधी, माजी केंद्रीय गृहमंत्री- सुशीलकुमार शिंदे , खासदार राहुल गांधी, इम्रान प्रतापगढी, प्रणितीताई शिंदे, सिद्धाराम म्हेत्रे ,अल्पसंख्यांक विभाग प्रदेशाध्यक्ष- डॉ. वजाहत मिर्झा .यांच्या नेतृत्वाखाली कार्य करून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे- "रशीद भाई तांबोळी" यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा