Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

*सांगली येथील "वसंतदादा पाटील" घराणे संपवणाऱ्या प्रवृत्तीला जागा दाखवण्यासाठी-- "विशाल"पर्वास प्रारंभ..*

 


*इक्बाल मुल्ला--सांगली


"शह - काटशह"च्या राजकारणात सांगली जिल्ह्याची झालेली राख आणि न झालेला विकास शिवाय जे .जे .पी.च्या गलिच्छ राजकारणातून झालेला भ्रमनिरास आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या स्व .वसंतदादा पाटील यांच्या वारसांच्या "पीछेहाट" साठी सातत्याने होत असणारे त्रयस्थांचे प्रयत्न - घाणेरडी "ईर्षा" सांगलीकर जनता आता सहन करू शकत नाही, हें विशाल पाटील यांच्या नुकत्याच झालेल्या पदयात्रे च्या निमित्ताने "सिद्ध" झाले. 



अंगाची लाही - लाही होत असताना, 40 डिग्री तापमानात, प्रचंड उन्हाचे चटके सोसत, रस्त्यावर उसळणारा 25 - 30 हजार चाहत्यांचा जनसागर, विशाल यांच्या विजयाची "साक्ष" देत होता.

यंदाची 2024 ची लोकसभा निवडणूक सांगलीकर जनतेने आपल्या हातात घेतल्याचे चित्र आज स्पष्ट होत आहे. ज्याच्या - त्याच्या तोंडात विशाल - विशाल आणि विशालच आहे. स्व. वसंतदादा पाटील यांच्या पश्चात त्यांचे नातू विशाल पाटील यांना मिळणारी ही सहानुभूती "अविस्मरणीय" आहे . 



काँगेस चे माजी मंत्री महाराष्ट्राचा कर्तृत्ववान - स्वछ चेहरा विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांना "तिकीट" मिळण्यासाठी केलेली धडपड कौतुकास्पद आहे .त्यांचे "योगदान" वाया जाणार नाही . तासगाव -कवठेमहांकाळ चे बलाढ्य नेते अजितराव घोरपडे आणि जतच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे परखड नेते विलासराव जगताप यांचा "पाठींबा" विशाल यांना मिळाला आहे ही त्यांची जमेची बाजू आहे .त्याशिवाय महापालिकेचे बहुतांशी नगरसेवकांची "फोज" विशाल यांच्यासाठी "तन-मन-धन" *वनिष्ठा व्यक्त करणार असल्याचे समजते .

भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याबद्दल जनतेमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत.त्यांनी ही त्यांच्यापरीने "विकासकामे" केली आहेत. अशातच काही आमदारांसोबत त्यांचे असलेले "सख्य" परिचित आहे .

सांगली हा काँगेसचा पारंपारीक गड असताना महाआघाडी च्या वतीने 

शिवसेनेचे पैलवान "चंद्रहार पाटील" यांची उमेदवारी घाईघाईने जाहीर केली . आज "एकास एक" लढत झाल्यास ,विशाल यांच्या विजयाचा "वारू" कोणीच रोखू शकणार नाही.परंतु चंद्रहार सोबत तिरंगी लढत झाल्यास संजय पाटील यांचे पारडे निश्चित जड असेल. अजूनही वेळ गेलेली नाही, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी सांगलीत "विजयी" होणाऱ्या संभाव्य उमेदवाराची चाचपणी करून योग्य तो निर्णय घ्यावा. 

2024 ची बदलती " हवा" तसेच वसंतदादा घराणे संपवणाऱ्या प्रवृत्तीला होणारा प्रचंड विरोध पाहता सांगलीकर जनता "बंड" करणार हें निश्चित ! 

आज स्व. वसंतदादा पाटील यांच्यानंतर सांगली जिल्ह्यात "विशालपर्वाची " सुरवात झाली आहे असे म्हंटले तर फारसे वावगे ठरू नये. धन्यवाद ! 


*इकबाल बाबासाहेब मुल्ला* ( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध ,

संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली.

मोबाईल - 8983587160

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा