*अकलुज -----प्रतिनिधी*'
*शकुर ---तांबोळी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
अकलूज ता. माळशिरस येथे सर्व समाजाचे बांधव सर्व सण आनंदाने व गुण्यागोविंदाने साजरा करत असतात.गेल्या एकाच आठवड्यात 3 पावन महोत्सव रमजान ईद, महात्मा ज्योतिबा फुले आणि भिमजयंती,असे उत्सव आल्यामूळे या आठवड्यात मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन सर्व धर्म समभावचा संदेश अकलूज येथे देण्यात आला. सालाबादप्रमाणे यंदाही सामाजिक ऐक्याचे दर्शन अकलूज येथील दलित-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन जातीय सलोखा कायम ठेवला.
रमजान ईद सण ज्या उत्सहाने व शांततेत साजरा केला त्याचप्रमाणे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सुद्धा इतर समाज बांधवाप्रमाणे मुस्लिम समाजातील सर्व बांधवानी आनंदाने साजरी केली. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मुस्लिम बांधवातर्फे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी दर्गा मशिदीचे हुसेन चाचा,सलीमभाई सय्यद,राजअल्ली मुलाणी, इन्नूस शेख, रशीद शेख,कलीम फकीर,फिरोज शेख,जुनेद शेख,सुधीर काटे यांच्यासह अकलूज परिसरातील अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकलूज शहर बागवान मुस्लिम जमातीच्या वतीने जमाती चे इम्तियाजभाई चौधरी,चाॅंदतारा फाउंडेशनचे अध्यक्ष नदीमभाई चौधरी, इम्रान मोतीलाल, ताहेर मोहोळकर, साहील बागवान, अब्रार मोहोळकर, साद बागवान, अनिस बागवान,व अकलूज शहरातील मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होते...
यावेळी हरी मोरे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा