इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- देशात व राज्यात यापुर्वी असली संस्कृती कधी पाहिली नव्हती, विरोधकांचा सगळा आर्थिक स्रोत मोडायचा त्यांचा संसार पुर्णपणाने उध्वस्त करून त्याला धमक्या द्यायच्या अशी पद्धत महाराष्ट्रात कधीच पहायला मिळाली नसल्याचे टिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ बावडा बाजारतळ येथे आयोजित जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते. यावेळी उत्तमराव जानकर, आप्पासाहेब जगदाळे, भरत शहा, ॲड तेजसिंह पाटील, महारूद्र पाटील, अमोल भिसे, अमोल देवकाते, अशोक घोगरे, छाया पडसाळकर, सागर मिसाळ, अश्विनी साठे, रेश्मा शेख, विकास लवांडे, ॲड. कविता म्हेत्रे, प्रदिप जगदाळे, जयवंत सुर्यवंशी, बाळासाहेब कोकाटे, अण्णा काळे, विजय घोगरे, विजय गायकवाड, अभिजीत घोगरे, रणजीत घोगरे, श्रेयस बागल, समाधान बोडके, महादेव कांबळे, अमोल भोसले, दादासाहेब साठे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले, देशाला सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भारतातील सर्वात स्वच्छ पक्ष आहे. लोकांची भावना अशी का आहे तर तुमच्या खिशात जेवढे आहे तेवढे काढायची उद्योग या सरकारने केला आहे. तुमच्या शेती औजारे, खत, घर खर्चात केंद्र व राज्य सरकारने कर लादला आहे. केंद्र सरकारमध्ये बसलेल्या भाजपाच्या लोकांनी भारतीय नागरिकांची अशी पाकिटमारी लावली आहे. तुम्ही म्हणाल त्या गोष्टीवर कर लावला असून या देशात करा विरहीत काहीही मिळत नाही. या देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार कोणता असेल तर तो ईलेट्राॅल बाॅडचा झाला आहे. राजकीय पक्षांना देणग्या देण्यासाठी पाच वर्षांपूर्वी इलेक्ट्रॉल बाॅडचा एक कायदा आणला. हा देश लय पोचलेल्या लोकांचा असून देणग्या घेण्यासाठी गुप्त व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपाने यातून आठ ते दहा हजार कोटी गोळा केले तेही सर्वांना ईडीच्या नोटीसा देण्यात आले होते. या देशातील सामान्य माणसाच्या जिवनाची किंमत नाही त्यामुळे सावध होण्याची वेळ आता आली आहे. आता चारशे पार कोण बोलत नाही तर दोनशे पार होतील का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मी राज्यभर फिरत आहे त्यामुळे चित्र बदलले असून भाजपाचा पंतप्रधान होणार नसून विरोधी आघाडीचा पंतप्रधान होणार अशी परिस्थिती आहे. उद्याच्या निवडणूका शेवटच्या ठरू नये यासाठी भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी मत द्यावे. तुम्ही करणार असलेले मतदान तुमच्या भावी पिढ्यांचे लोकशाहीत टिकण्याचा अधिकार जिवंत ठेवणारे आहे. महागाई, बेकारी, महिलांवरील अत्याचार अशा त्रासातून मुक्त होण्यासाठी सुप्रिया सुळे यांना मतदान करावे असे आवाहन केले.
कोण कोणाचा प्रचार करतोय त्यात कोणाचा नाईलाज झालाय हे सांगायची गरज नाही. ज्यांना आयुष्यभर ज्यांच्याबरोबर उभा डावा होता आज त्यांचाच प्रचार करायला लागणे यांच्यापेक्षा वाईट आयुष्यात काहीच नाही. वरच्यांच्या आदेशाला घाबरणारी महाराष्ट्रात लयच निघाली हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी दररोज महाराष्ट्रातील सभांमधून शरद पवार यांच्यावर टिका करत आहेत. शरद पवार महाराष्ट्राचा आत्मा असून महाराष्ट्राच्या आत्म्यावर जेवढी येवून सतत नरेंद्र मोदी टिका करतील तेवढं महाराष्ट्र शरद पवारांच्या मागे ठामपणे उभा राहिल. सध्याला महाराष्ट्राचे चित्र बदलले आहे. महिन्यापुर्वी असं वाटायचं की आता काही खरं नाही. महिन्याभरानंतर असं वाटतंय की आता त्यांचं काही खरं नाही. अनेकांनी शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळेच हा आमुलाग्र बदल पहावयास मिळतो आहे. आमच्या कडे बलदंड असे कोणी नसताना शरद पवारांच्या अशा दहापट मोठ्या सभा पार पडताहेत. महाराष्ट्रातील लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहेत. असं का झालं यांचे आत्मचिंतन करण्याची वेळ राज्यकर्तेवर आली आहे. आता राज्यच जाणार असल्यामुळे चिंतन करायला भरपूर वेळ आहे. भाजपाकडे १०५ आमदार असताना चांगले चाललेले सरकार पाडून आमदार पळवून नेल्याचा राग मराठी माणसाच्या मनात बसलाय. पारावर चर्चा होते ना तेव्हा आमदारांच्या राजकीय कॅरीअरची धुळदान झाल्याने पुढच्या वेळी एक आमदार निवडून येणार नाही. महाराष्ट्रातील मराठी माणसांनी उभे केलेले दोन पक्ष फोडले व दोनशेपेक्षा जास्त आमदार आमच्याकडे आहेत असे शेखी मिरवणारे भाजपा सरकार आज घाईला का आले हा माझा खडा सवाल आहे. दोन पक्ष फोडल्यानंतर जी सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे ती यांना आवरेना झाली आहे. नरेंद्र मोदी व अमित शहा दररोज महाराष्ट्रात सभा चालू आहेत. अमित शहा म्हणताहेत शरद पवारांनी काय केले ते आम्ही महाराष्ट्राला सांगू. पण अमित शहा तुम्ही गुजरात करीता काय केले हे एकदा कळू द्या. शरद पवारांना टार्गेट का करताहेत तर महाराष्ट्र शरद पवारांच्या पाठीशी उभा आहे.
यावेळी उत्तमराव जानकर, आप्पासाहेब जगदाळे, अशोक घोगरे, विजय गायकवाड, ॲड किरण म्हेत्रे आदिंची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दळवी सर यांनी तर आभार ॲड तेजसिंह पाटील यांनी मानले.
फोटो - बावडा बाजारतळ येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना आमदार जयंत पाटील.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा