*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
धाराशिव लोकसभा मतदारसंघात 'मविआ'च्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मा. ओमराजे निंबाळकर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. याप्रसंगी उन्हाच्या तडाख्याने आमदार मा. कैलासदादा घाडगे-पाटील यांना भोवळ आली. ते चक्कर येवून पडले. या प्रसंगानंतर महायुतीच्या प्रचारसभेत मा. आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी '.. याला भोवळ कसं काय आली? दिवस गेले की काय?' अशी टिपणी केल्याच्या क्लिप्स व्हायरल झाल्या.
हे ऐकल्यानंतर पुरुषांनाही 'दिवस जातात' याचा शोध आरोग्यमंत्री तानाजीराव यांनी 'हाफकीन'च्या माणसाला सोबत घेवून लावला असावा असा अंदाज येतो.
आता यापुढे राज्यात कुणाही पुरुषाला भोवळ आली तर त्याला 'दिवस गेले आहेत' असे समजावे आणि त्याचे 'डोहाळे जेवण' हा अचाट शोध लावणाऱ्या तानाजीरावांकडून घ्यावे. तसेच एखाद्या भोवळ आलेल्या पुरुषाच्या घरी कालांतराने अपत्य जन्माला आल्यास ते त्या भोवळ आलेल्या पुरुषानेच जन्मास घातले आहे असे समजून 'पुरुषाला दिवस जातात' असा शोध लावणाऱ्या तानाजीरावांना त्या अपत्याच्या नामकरणास बोलवावे. नामकरणात तानाजीरावांना घुगऱ्या खावू घालाव्यात जमल्यास सोबतीला 'खेकड्याच्या आमटी'चाही बेत करावा.
तानाजीरावांकडून अपत्याचे नामकरण करुन झाल्यावर नामकरण करणाऱ्या आत्याच्या पाठीवर सगळे धपाटे घालतात तसे धपाटे तानाजीरावांच्या पाठीवर घालण्यास विसरु नये.
'पुरुषांना दिवस जातात' या शोधासह लोकसभेच्या निवडणूकांत विरोधी उमेदवार व त्यांच्या समर्थकावर कशा-कशा प्रकारची टीका केली जावू शकते याचाही शोध तानाजीरावांनी लावलेला आहे.
दरम्यान देशातल्या अतिमागास असलेल्या जिल्ह्यातून असे अचाट शोध लावल्याबद्दल तानाजीरावांच्या कर्तृत्वापुढे 'नोबेल पारितोषिकही' फिके पडेल अशी गौरवाची भावना मतदारसंघातील जनमानसातून व्यक्त होत आहे.
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा