Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ११ मे, २०२४

*राज्यात 14! मे पर्यंत विविध भागात पावसाची शक्यता*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या बुलेटीनमध्ये नुसार महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मंगळवार १४ मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील आहे. दरम्यान ४० - ५० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वारा वाहणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. उष्ण, दमट वातावरणात काहीसा बदल होत असून मंगळवारपर्यंत (दि.१४) वादळी पावसाची शक्यता असल्याचेही भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

     


महाराष्ट्रासह बिहार, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील पुणे येथे आज शनिवार ११ मे आणि रविवार १२ मे तर नांदेड, लातूर, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये रविवार १२ मे रोजी ऑरेंज अलर्ट असून, मुसळधार पावसाची अधिक शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 


*११ मे-* रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे (ऑरेंज अलर्ट), कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ


*१२ मे-* ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक, अहमदनगर, पुणे (ऑरेंज अलर्ट), कोल्हापूर, सातारा (ऑरेंज अलर्ट), सांगली, सोलापूर. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड (ऑरेंज अलर्ट), लातूर (ऑरेंज अलर्ट), धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर (ऑरेंज अलर्ट), गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम यवतमाळ (ऑरेंज अलर्ट)


*१३ मे-* रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ


*१४ मे-* पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा