उपसंपादक---- नुरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यात माढा लोकसभा मतदार संघातील आज मतदान शांततेत पार पडले.गणेशगांव (ता.माळशिरस) या गावात एकूण १०४९ स्त्री व पुरुष मतदार आहेत.त्या पैकी ७८६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.एकूण ७४.९२ टक्के मतदान झाले आहे.विशेष म्हणजे ७८६ हा अंक हा मुस्लिम समाजात शुभ मानला जातो.त्यामुळे आपला विजय निश्चित आहे असा आत्मविश्वास गावकऱ्यांनी सोडला आहे.गणेशगांव हे मोहिते पाटील परिवाराला मानणारे आहे.या भागात अनेक विकासची कामे मोहिते पाटील यांनी केली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा