*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
संपूर्ण देशभरात भाजपाला होणारा अभूतपूर्व "विरोध" आणि जनतेने हातात घेतलेली लोकसभेची निवडणूक 2024 च्या राजकीय पटलावर नवे नेतृत्व आणि नवे समीकरण घडण्यासाठी "सज्ज" होत आहे.
2024 च्या या निवडणुकीत इंडिया आघाडी ला "उच्चांकी यश" मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यांना किमान 330 जागा" मिळण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. तर भाजपा मित्रपक्षाला केवळ 242 जागा* मिळतील अशी शक्यता आहे. राष्ट्रपती सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सरकार स्थापन करण्याचे "निमंत्रण" देण्याची शक्यता आहे. जागा कमी आणल्याने नरेंद्र मोदी यांच्याऐवजी "आर.एस .एस." आणि भाजपचे मोदी सरकारची "वक्रदृष्टी" असणारे अनेक मोठे नेते नितीन गडकरी यांचे नावं पंतप्रधानपदासाठी पुढे आणण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी हे अजातशत्रू व्यक्तिमत्व आहेत . शिवाय मराठी अस्मिता* केंद्रबिंदू ठेवत महाराष्ट्रातील आणि देशातील बहुतांशी विरोधी पक्ष देखील आपला "पाठींबा" नितीन गडकरी यांना देऊ शकतात.
दुसरीकडे जागांचे गणित जुळले नाही तर बलाढ्य वरिष्ठ "दलित नेता" असणाऱ्या मल्लीकार्जून खर्गे यांना "सर्वसंमतीने" पहिला दलित पंतप्रधान या पदाचा "सन्मान" मिळू शकतो.
गतवर्षी उत्तरप्रदेश ,महाराष्ट्र आणि राजस्थान या ठिकाणी संपूर्ण "क्लीन स्वीप" मारणाऱ्या भाजपाची या ठिकाणी परिस्थिती अतिशय "दयनीय" झाली आहे.व याचा प्रचंड "फटका" या पक्षाला बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र - बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँगेस पक्ष फोडण्याचे कार्य "भाजपाने" केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने मराठी अस्मिता जपत, महाराष्ट्रात येणारे 18 उद्योगधंदे "गुजरात" मध्ये पळवणाऱ्या "मोदीसरकारला" अर्थात भाजपाला अद्दल घडवली आहे असे चित्र दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात "48 जागांपैकी" भाजपाला केवळ "10 जागाच" मिळणार असल्याने इंडिया आघाडी तब्बल 38 जागी विजयी पताका लावणार असल्याचे सिद्ध होत आहे.
उत्तरप्रदेश* मध्ये देखील मतदारांनी महागाई - रोजगार - हमीभाव याला महत्व देत 10 वर्षाचे "जुमलाबाज" सरकार उलथविले असल्याचे दिसत आहे. उत्तरप्रदेश च्या 80 जागांपैकी भाजपाला फक्त "40 जागा मिळत असल्याचे दिसत आहे. येथेही इंडिया महाआघाडीला 40 जागांचा फायदा होत असल्याचे दिसते.
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलचा डंका जोरात असल्याचे दिसते. येथे इंडिया आघाडीला "35 जागा" जिकंत भाजपाला केवळ 11 जागा मिळणार असल्याचे दिसत आहे.
ज्या पंजाब मध्ये 600 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला ,त्या पंजाब मध्ये 13 जागा आहेत सरकारचा "तीव्र विरोध" पाहता पंजाब मध्ये भाजपचे खाते ही उघडणार नाही असे दिसते. येथे इंडिया आघाडीला 13 पैकी 13 जागा मिळत आहेत.
बिहार राज्यामध्ये 40 जागा आहेत. येथेही तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांची जादू चालली असून भाजप महायुती चे येथेही "पानिपत" निश्चित आहे. येथे ही इंडिया आघाडीला 32 जागा आणि भाजपा महायुतीला 8 जागा मिळतील.
कर्नाटक मध्ये 28 जागा आहेत. येथे काँग्रेसचे सरकार आहे. सर्वप्रथम विधानसभेत महागाईच्या मुद्य्यांवर जनतेने भाजपाला नाकारले. आताही भाजपाला फक्त 5 जागा मिळण्याची शक्यता असून इंडिया आघाडीला 23 जागा मिळण्याची शक्यता आहे.
छत्तीसगड मध्ये मतदारांनी हिशोब चुकता करत 11 जागांपैकी 8 जागांवर इंडिया आघाडी "दणदणीत विजय" मिळणार असल्याचे दिसते.
गोव्याच्या 2 जागांपैकी दोन्ही जागा इंडिया आघाडी घेणार हे स्पष्ट झाले आहे.
दिल्लीमध्ये ही 7 जागांपैकी 6 जागा इंडिया आघाडी जिंकेल असा आशावाद व्यक्त होताना दिसत आहे. येथे गेल्यावेळी 7 जागा जिंकणाऱ्या भाजपाला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागेल. अरविंद केजरीवाल यांच्या कर्तृत्वाकडे पाहून येथे इंडिया आघाडी विजयी होण्याची शक्यता आहे.
तामिळनाडू मध्ये आतापर्यंत प्रादेशिक पक्षांनी भाजपाची डाळ शिजू दिली नाही.येथे असणाऱ्या 39 जागांपैकी फक्त 2 जागा भाजपाला मिळतील व अन्य जागा प्रादेशिक पक्ष असणाऱ्या वाय.एस.जगन मोहन रेड्डी यांना मिळण्याची शक्यता आहे.
कश्मीर मध्ये ही असणाऱ्या 6 जागा भाजपा गमावण्याची शक्यता आहे . तेथेही प्रादेशिक पक्ष आणि इंडिया आघाडी यांना सर्वच्या सर्व 6 जागा मिळण्याचे संकेत आहेत.
अन्य राज्यांपैकी गुजरात मध्ये भाजपचे संपूर्ण वर्चस्व दिसत आहे. उत्तराखंड,लडाख ,तेलंगणा अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड ,मेघालय पडुचरी , मुजोरम,लक्षद्वीप ,त्रिपुरा, सिक्कीम,आसाम ,ओरिसा ,झारखंड, हिमाचल प्रदेश आदी जागांवर कमी - अधिक प्रमाणात असेच प्रमाण असण्याची शक्यता आहे.
इंडिया आघाडी चांगली म्हणून नव्हे तर भाजपा विरोध म्हणून आज जनतेने "भाजपविरोधी कौल" दिला आहे . गेल्या 10 वर्षातील भाजपा सरकारचा राग यंदा लोकसभा निवडणुकीत जनतेने काढला आहे असे म्हंटले तर अतिशियोक्ती ठरू नये.
*इकबाल बाबासाहेब मुल्ला* (*पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा