*अकलूज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद बंगलोर येथील त्रिसदसीय नॅक मुल्यांकन समितीने दि.२८ व २९ मे रोजी अभियांत्रिकी महाविद्यालयास भेट दिली.सदर समितीमध्ये महर्षी दयानंद युनिव्हर्सिटी रोहतक (हरियाणा) येथील डॉ.राजेंदर चिल्लर हे अध्यक्ष होते,पंजाब इंजिनीरिंग कॉलेज (चंदिगढ) येथील डॉ. संजीव सोफट हे सदस्य समन्वयक तर युनाइटेड इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी येथील डॉ.राधाकृष्णन राथिनवेल (तामिळनाडू) हे सदस्य म्हणून उपस्थित होते.त्यांनी महाविद्यालयातील सर्व सोई, सुविधा तसेच कागद पत्रांची प्रत्यक्ष तपासणी करून सीलबंद अहवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण ढवळे यांच्याकडे सुपूर्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा