*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मुंबई - 23 मे :* पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावांचा उल्लेख करत अलिबागमधील एका महिलेला तब्बल 40 लाखांचा गंड घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधारकार्डचा गैरवापर झाल्याची खोटी माहिती देऊन महिलेला लुटण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत बँकेतील अधिकारी, कस्टमर केअर, एलआयसी, आधार कार्ड केंद्र आणि लकी ड्रॉ कॉन्सर्टमधून बोलतोय असे सांगून सर्वसामान्यांना गंडा घालण्याचे प्रकार घडले आहेत. त्यानतंर सध्याच्या डिजिटल युगात युपीआय पेमेंट आणि ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होताना दिसते. मात्र आता पोलीसांच्या नावाने लोकांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत.
पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने फसवणूक झाल्यामुळे पोलिसांमध्येही खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ग्रुप कॉलवर पोलीस अधिकारी दीक्षित मॅडम आणि विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचे सांगून महिलेचा विश्वास अज्ञात व्यक्तीने संपादीत केल्यामुळे पीडित महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला. यानंतर आरोपीने महिलेला, तुमच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, ईडी, सीबीआय, मुंबई पोलीस यांच्याकडील गुन्ह्यात अटक वॉरंट असल्याची भीती निर्माण केली. त्यानंतर, संबंधित महिलेच्या बँक खात्यातून परस्पर ऑनलाइन 40 लाख 73 हजार 719 रुपये स्वत:च्या खात्यात वळवून घेतले.
महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितले. यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा