Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २३ मे, २०२४

*वीज चोरीची बातमी प्रसिद्ध केल्याने पत्रकाराला ठार मारण्याची धमकी अज्ञात आवर गुन्हा दाखल!*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

खेडमधील मुळगाव येथील जांभा खाणीवर महावितरणने लाखो रुपयांच्या वीजचोरी प्रकरणी केलेल्या कारवाईची बातमी केली म्हणून खेडमधील पत्रकाराला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी मंगळवारी सायंकाळी फोनवरून धमकवणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर खेड पोलीस ठाण्यात धमकीचा तसेच पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



पत्रकार चंद्रकांत बनकर यांना अनोळखी नंबर वरून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची तक्रार त्यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर भा.दं. वि.सं. कलम ५०४, ५०६, ५०७ तसेच महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम २०१७ चे कलम ३.४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी ( दिनांक १८ मे रोजी) खेड तालुक्यातील मुळगाव येथील रामचंद्र बुदर यांच्या जांभ्याच्या खाणीत दोन कमर्शियल मीटरमध्ये वीजचोरी झाल्याप्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई केली. त्यानंतर महावितरणने तब्बल २६ लाख रुपयांची बिले रामचंद्र बुदर या खाण मालकाला दिली. महावितरणच्या या कारवाईची बातमी लावल्याच्या रागातून १९ मे रोजी चंद्रकांत बनकर यांना दिवसभरात तब्बल तीन वेळा धमकीचे फोन आले. त्याच दिवशी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी मोबाईल नंबरवरून ते घरी असताना कॉल आला. जांभ्याच्या खाणींच्याबाबत एकही बातमी यापुढे लावायची नाही, नाहीतर परिणाम वाईट होतील. बातम्यांसाठी कसा फिरतोस ते बघतो, ऑफिसला येऊन आमची मुले राडा घालतील, अशाप्रकारे व शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबत सोमवारी पत्रकार चंद्रकांत बनकर यांनी या घडलेल्या प्रकरणी तक्रार दाखल केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा