Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १४ मे, २०२४

*निंबवडे ता. आटपाडी येथील "पोष्टमास्तर"पदावरुन निवृत्त झालेल्या " युन्नुस तांबोळी " यांचा सत्कार.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

निंबवडे ता.आटपाडी जि. सांंगली येथील युन्नुस चाच्या 42 वर्ष नंतर काल सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त पोस्ट ऑफिस चे वरिष्ठ अधिकारी यांनी पोष्ट मास्तर या सेवेतून सेवानिवृत्त झालेले युन्नुस तांबोळी आणि त्यांच्या धर्मपत्नी सह सत्कार करण्यात आला ,आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात मोबाईल व इतर साधनामुळे पोस्ट खात्याचे महत्व म कमी झाले असले तरी पूर्वीच्या काळात पोस्टमन ला गावचे सरपंच एवढे महत्त्व होते  


   

                 निम्बवडे गावाचे ज. युन्नुस रसूल तांबोळी यांनी सन 1981 साली पोस्ट ऑफिस मध्ये रनर च्या नोकरी पासून सुरुवात केली त्यानंतर पोस्टमन आणि पोस्ट मास्तर पर्यंत पदोन्नती मिळवून एक वेगळा ठसा निर्माण केला ,या कालावधीत या पंच क्रोशितील प्रत्येक माणूस कुठे आहे याचा ठावठिकाणा व माहिती त्याचे कडे मिळायची शासकीय कामानिमित्त कोणताही शासकीय अधिकारी निंबावडे गावात आला तर तो प्रथम युन्नुस तांबोळी याचे कडे माहिती साठी यायचे अशा पद्धतीने अगदी शासनाचा दुत म्हणून त्यांनी 42 वर्ष आपली सेवा बजावली त्यांनी 42 वर्षाच्या कालावधीत कामात चुकारपणा केला नाही आपले कर्तव्य बजावले म्हणून कसलीही दंड अगर शिक्षा झाली नाही काल आटपाडी येथे पोस्ट खात्याचे वरिष्ठ अधिकारी आणि गावचे ग्रामस्थ यांनी त्याचे सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करून भावी आयुष्य साठी शुभेच्छा दिल्या..




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा