Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २८ मे, २०२४

* *धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी -- जिल्हाधिकाऱ्याकडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज भैया पाटील यांची मागणी*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

धाराशिव ( उस्मानाबाद) जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे,व घरांचे प्रचंड नुकसान झाले.असुन त्यांचे नुकसान झाले आहे अनेकांचा प्रपंच या वादळी वाऱ्यामुळे झाला असून जीवनावश्यक वस्तू सुद्धा अवकाळी पावसाने भिजून नुकसान झाले आहे ही अत्यंत विदारक परिस्थिती असून अक्षरशः अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.. या परिस्थितीत शेतकरी कष्टकरी आणि नुकसान झालेल्या बांधवांच्या आपण पाठीशी असून त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून द्यावी अशी मागणी धाराशिव चे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आणि नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा क्रॉंगेस कमिटीचे अध्यक्ष धिरज भैया पाटील यांनी यावेळी सांगितले 





याप्रसंगी धाराशिव जिल्हा क्रॉंगेस कमिटी मुख्य संघटक- राजाभाऊ शेरखाने, क्रॉंगेस कमिटी उपाअध्यक्ष -सय्यद खलिल सर', धाराशिव शहर अध्यक्ष -अग्नीवेश शिंदे , उपाअध्यक्ष - प्रशांत काका पाटील , संचालक डी सी सी धाराशिव महेबुब पाशा पटेल , कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक- उमेशराजे निंबाळकर शिलाताई उंबरे, नंदू भैय्या क्षिरसागर, माजी पंचायत समिती सदस्य- धाराशिव अशोक बनसोडे, संजय संभाजी कदम , सलमान शेख ,सफराज काझी, इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा