इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
-- इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेला हल्ला हा अतिशय धक्कादायक असुन हल्लाखोरांवर ताबडतोब कठोर कारवाई करण्याच्या सुचना आमदार दत्तात्रय भरणे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.
तहसीलदार श्रीकांत पाटील नेहमीप्रमाणे आज सकाळी आपल्या कार्यालयाकडे जात असताना अचानकपणे हल्लाखोरांनी त्यांच्यावर मिरचीपुड टाकून हल्ला केला. मात्र सुदैवाने श्री. पाटील आणि त्यांचे वाहनचालक या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.
आमदार दत्तात्रय भरणे यांना माहिती समजताच त्यांनी त्वरित तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती घेऊन तब्येतीची विचारपूस केली. याविषयी बोलताना श्री. भरणे म्हणाले की, श्रीकांत पाटील हे अतिशय प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तालुक्यामध्ये परिचीत असुन त्यांच्या प्रशासकीय कामकाजाविषयी जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र असे असताना त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे हे अतिशय धक्कादायक असून या हल्ल्याचा आमदार भरणे यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. ज्यांनी कोणी असा भ्याड हल्ला केला आहे. त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा