*अकलुज ----प्रतिनिधी*
*लक्ष्मीकांत कुरुडकर*
*टाइम्स 45 न्युज मराठी
दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाने अकलूज माळेवाडी भागातील केळी पिके जमीन दोस्त झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांची काढणीला आलेली केळी पिक भुईसपाट झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे
करण्याचे मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके भुईसपाट झाली आहेत सध्याचे दुष्काळी परिस्थिती,
लाईटचा लपंडाव, वाढलेल्या खताच्या किमती, आधी परिस्थितीला तोंड देऊन मोठ्या जिद्दीने पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या पिकांचे वादळी वाऱ्यामुळे
क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. अनेक संकटाशी सामना करून हता तोंडाशी आलेला घास जमीन दोस्त झाल्याने शेतकरी पुरता कोल मोडला आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे तरी शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. * अवकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने काढणीला आलेली आमची केळीची तीन एकर बाग पूर्णपणे उध्वस्त झाली असून 13 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी अशा संकटात कसे उभे राहायचे किती वेळा नुकसान सहन करायचे अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. तरी शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. दत्ता एकतपुरे (शेतकरी माळेवाडी)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा