Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २२ मे, २०२४

*बारावी सायन्स नंतरच्या "शैक्षणिक वाटा" या संदर्भात-- डॉ, आबासाहेब देशमुख यांचे मार्गदर्शन*

 


*विशेष-प्रतिनिधी---एहसान मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी

आज एच. एस. सी .परीक्षेचा निकाल घोषित झाला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. निकालाची टक्केवारी जर आपण पाहिली तर प्रत्येक विभागाचे निकालाची टक्केवारी 92 ते 94% च्या पुढेच आहे. अनेक विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्कची टक्केवारीही खूप मोठी आहे. त्यामुळे सर्वांनाच मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला प्रवेश मिळेलच असे नाही. त्यामुळे कमी मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता काळाची गरज ओळखून नवनवीन वाटा शोधल्या पाहिजेत. मी स्वतः सायन्स विषयाचा प्राध्यापक व प्राचार्य म्हणून 40 वर्षापेक्षा जास्त शिक्षण क्षेत्रात काम केले असल्याने माझ्या अनुभवाच्या आधारे सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांना कोणत्या शिक्षणाचा संधी उपलब्ध आहेत याबद्दलची थोडक्यात माहिती देत आहे .प्रत्येक पालकांना आपला मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियरच झाला पाहिजे असे वाटते मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही म्हणजे आपले सर्व संपले असे न मानता मेडिकल इंजिनिअरिंग पेक्षाही आणखी काही शाखा आहेत ज्याला ही तेवढेच महत्त्व आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

            मेडिकल शाखेमध्ये एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस., युनानी इत्यादी महत्त्वाच्या शाखा आहेत .तसेच वैद्यकीय शाखेची संलग्न काही अभ्यासक्रम ही उपलब्ध आहेत .

          इंजिनिअरिंग शाखेमध्ये कॉम्प्युटर, मेकॅनिकल, सिविल ,इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ,इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या बेसिक आणि अत्यंत महत्त्वाच्या शाखा बरोबर काळाची गरज ओळखून अनेक नवनवीन शाखा निघत आहेत .त्याचाही विद्यार्थ्यांनी विचार करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग, एरोस्पेस इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग ,एग्रीकल्चरल इंजीनियरिंग, जॉग्रफिकली इंजीनियरिंग ,आर्टिफिशियल इंटेलिजन्स ,पेट्रोलियम इंजिनिअरिंग ,सायबर सेक्युरिटी ,पॉवर इंजीनियरिंग , टेक्स्टाईल इंजिनिअरिंग ,मरीन इंजिनिअरिंग ,मायनिंग इंजीनियरिंग यासारख्या भविष्यामध्ये महत्त्व येणाऱ्या शाखांचाही विद्यार्थ्यांनी विचार करणे आवश्यक आहे .इंजीनियरिंग, मेडिकल बरोबरच आर्किटेक्चर ,एग्रीकल्चरल ,फार्मसी यासारख्या शाखा ही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर आज शिक्षक व प्राध्यापक यांना मिळणारे वेतन याचा विचार केला तर शिक्षक किंवा प्राध्यापक होणे ही एक विद्यार्थ्यांना चांगली संधी आहे. ज्यांना वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करायची आवड आहे त्यांनी बी.एससी. करून एम . एससी. पीएच.डी. किंवा नेट /सेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ज्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक व्हायचे आहे त्यांना बी.एससी. करून एम. एससी .बी. एड. व्हावे लागेल .शाळेमध्ये सायन्स टीचर होण्यासाठी बी.एससी. बी.एड .आवश्यक आहे. त्याचबरोबर फिशरी सायन्स, सेरी कल्चर (रेशीम उत्पादन),

  मायक्रोबायोलॉजी ,बायो-इन्फर्मेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी ,एग्रीकल्चर टेक्नॉलॉजी ,वॉटर मॅनेजमेंट यासारखे अनेक अप्लाइड कोर्सेसही तेवढेच महत्त्वाचे आहेत .

आज-काल ग्रॅज्युएशन करून एम.पी.एस.सी. यू.पी.एस.सी .परीक्षेच्या माध्यमातुन प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे ही एक अत्यंत चांगली संधी आहे. 

तसेच ज्या विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये रस आहे अशा विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये संशोधन साठी अनेक संधी व सुविधा उपलब्ध आहेत तसेच अनेक विद्यार्थ्यांचा विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याकडे कल वाढत आहे.

याव्यतिरिक्त अनेक नवनवीन शाखा व अभ्यासक्रम काळाची गरज ओळखून सातत्याने सुरू होत आहेत शेवटी विद्यार्थ्यांनी आपली आवड आपली कुणाची टक्केवारी व आपली कुवत विचारात घेऊन अभ्यासक्रम निवडणे गरजेचे आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुनश्च हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद .

          आपला,

 डॉ.आबासाहेब देशमुख

 माजी प्राचार्य 

शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज 

व 

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघ, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा