*विशेष-प्रतिनिधी---एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी
एखाद्या कामाबाबत जिद्द बाळगली आणि ईच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही हे एक अपंग आसलेल्या म्हणजे त्याला दोन्ही हात नाही तरी ही मनाशी निश्चय करुन त्याने पाया मध्ये पेन धरुन पायाने 12 वी चा पेपर लिहून उत्तीर्ण झाला आणि 78 % गुण मिळवले त्याच्या या जिद्दीला यशाला मनपासुन सलाम .
या बाबत सविस्तर माहिती आशी की
लातूर तालुक्यातील वसंतनगर तांडा (महापूर) येथे रेणुकादेवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा असून, या शाळेत गौस अमजद शेख याने पहिली ते बारावीपर्यंतचे विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले आहे. जन्मत: दोन्ही हात नसलेल्या गौसने जिद्दीने शिक्षण सुरू ठेवले. कितीही संकटे आली तरी खचून न जाता त्याने मात करत उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्याला आई-वडिलांचे वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले. आसुन याच रेणुकादेवी उच्च माध्यमिक शाळेत गौसचे वडील अमजद शेख हे सेवक म्हणून कार्यरत असून, आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती जेमतेम असतानाही गौसने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. आणि मनाशी निश्चय केला आपल्याला कांहीही करुन यश संपादन करायचे आहे आणि दोन्ही हात नसल्याने त्याने पायांच्या बोटांनी लेखणी धरुन 12 वी चा पेपर लिहिला.आणि या परिक्षेत 78 टक्के गुण मिळवुन
समाजापुढे एक आदर्श दिला
त्याच्या यशाबद्दल ""*टाइम्स 45 न्युज मराठी "* च्या वतीने हरूदिक अभिनंदन...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा