*अकलूज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या १२ वीच्या बोर्ड परीक्षेत अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या सात शाखेतून १२ वीसाठी १७१६ विद्यार्थी परीक्षेस बसले.त्यापैकी १६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व संस्थेचा निकाल ९३.८८ टक्के लागला.
संस्थेत कु.सानिया नजीर बागवान हिने ९४.५० टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकावला.तर कु.मुग्धा मुकेश निंबाळकर हिने ९२.३३ टक्के गुण मिळवित द्वितीय क्रमांक मिळवला तर कु.अदिती बळीराम शिकारे हिने ९०.१७ टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक पटकावला.या तिन्ही विद्यार्थींनी अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालय विज्ञान शाखेतील आहेत.
संस्थेच्या सदाशिवराव माने विद्यालय अकलूज या शाखेतील विज्ञान,कला,वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या सर्व विभागातून एकूण ६४८ विद्यार्थी पैकी ६१६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाखेचा निकाल ९५.६ टक्के लागला.
यशवंतनगर येथील महर्षी शंकरराव मोहिते प्रशालेत विज्ञान, कला,व्यवसाय अभ्यासक्रम यातील एकूण २५० पैकी २४० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९६ टक्के निकाल लागला.
अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाचा विज्ञान, कला,वाणिज्य,व्यवसाय अभ्यासक्रम या शाखेतील एकूण ४२७ पैकी ३८० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८८.९९ टक्के निकाल लागला.
सदाशिवनगर येथील कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेजचा विज्ञान,कला व वाणिज्य शाखेतील सर्वच १५९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला.
जिजामाता कन्या प्रशाला अकलूज येथील विज्ञान शाखेतील सर्वच १४२ विद्यार्थीनी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला.
वेळापूर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालयाचा कला शाखेतून एकुण ७० पैकी ५६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८० टक्के निकाल लागला.
नातेपुते येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या कला शाखेतील २० पैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९० टक्के लागला.
या यशाबद्दल संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,संचालिका कु. स्वरुपाराणी मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील,सर्व संचालक,विविध शाखेचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,सदस्य, शाखाप्रमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
*चौकट*
*संस्थेतील विज्ञान शाखेतून ९१० विद्यार्थ्या पैकी ९०२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९९.१२ टक्के लागला. कला शाखेतून ३८५ पैकी ३२५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ८४.४२ टक्के लागला. वाणिज्य शाखेतून २१४ पैकी २०१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९३.९३ टक्के लागला. व्यवसाय अभ्यासक्रमातून एकूण २०७ पैकी १८३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ८८.४१ टक्के लागला.*
*शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयातील कु.वैष्णवी महेंद्र पवार, कु.साक्षी आगतराव दांगट, व कु.स्वाती संतोष रणे यांनी पीक विज्ञान या विषयात १०० पैकी१०० गुण मिळवले आहेत.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा