*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
नवी दिल्ली - 23 मे :* दिल्लीतील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या नॉर्थ ब्लॉकमध्ये बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गृह मंत्रालयाला पाठवलेल्या मेलमध्ये नॉर्थ ब्लॉकमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. हा मेल मिळताच एकच गोंधळ उडाला. सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि शोध सुरू झाला. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. सध्या नॉर्थ ब्लॉकचा शोध सुरू आहे.
अद्याप काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही. ईमेल पाठवणाऱ्याचा पोलिस तपास करत आहेत. ईमेल मिळाल्यानंतर संपूर्ण प्रशासकीय कर्मचारी सतर्क झाले. पोलिसांनी प्रत्येक कानाकोपऱ्यात तपास सुरू केला. नॉर्थ ब्लॉक हा अतिशय संवेदनशील परिसर आहे. येथे अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था आहे. अशा परिस्थितीत बॉम्बच्या वृत्ताने दहशत निर्माण झाली आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दिवसांपूर्वी दिल्ली एनसीआरमधील 200 हून अधिक शाळांमध्ये बॉम्बची धमकी देणारा मेल आला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा