*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी निवेदन देवून माळशिरस तालुक्यातील माळखांबी येथे पाण्याचा टॅंकर चालू करण्यात यावा तसेच माळशिरस तालुक्यातील टँकर चालू असलेल्या सर्व गावात फेऱ्या वाढविणे बाबतचे निवेदन दिले. यावेळी युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,पूर्व विभागाचे तालुका उपाध्यक्ष बिभीषण साठे,माळखांबी शहर अध्यक्ष सतीश आप्पा साठे,माढा विधानसभा उपाध्यक्ष समाधान साठे,महादेव साठे,चेतन साठे उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यातील माळखांबी गावात पाण्याचा टँकर तात्काळ सुरू करण्यात यावा,तसेच बारमाही दुष्काळी असलेल्या,गारवड,भांब,मांडकी,पिंपरी,गावासह इतर गावात पाण्याच्या टँकरच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा